शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 31 मार्च 2015 (15:31 IST)

शाहरुख ट्विटरचा 'बादशहा', पण 'शहंशाह'पेक्षा अजूनही मागे

बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुखच्या चाहत्यांसाठी एक खुशखबरी आहे. त्याने एकदा परत हे सिद्ध केले आहे की 'डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं नामुमकिन है'. हो, खरंच शाहरुखने ट्विटरवर 12 मिलियन फॉलोवर्सपेक्षा जास्तचा आकडा पार केला आहे. तो सलमान खानपेक्षा किमान 8 मिलियन फॅन्सपेक्षा पुढे आहे.   
 
ट्विटरवर सलमानचे 11.2 मिलियन फॉलोवर्स आहे. शाहरुख फॅन्सच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदीपेक्षा पुढे आहे. मोदी यांचे ट्विटरवर   11.1 फॉलोवर्स आहे. बॉक्स ऑफिसवर भले शाहरुख, सलमान आणि आमिरपेक्षा थोडे मागे असेल पण फँसच्या बाबतीत तर तोच बादशहा आहे. 
 
'शाहंशाह'पेक्षा अद्याप मागेच  
ट्विटरवर #SRK12Million हॅशटॅग ट्रेंड करत आहे. पण शाहरुख अजूनही ट्विटरवर एका चित्रपट नायकाला पछाडू शकला नाही तो म्हणजे सुपरस्टार अमिताभ बच्चन. बिग बीच्या ट्विटरवर 14 मिलियन फॉलोवर्स आहे. बिग बी पण आपल्या चाहत्यांसोबत आपल्या गोष्टी शेअर करतात मग त्या त्यांच्या आठवणी असो किंवा त्यांच्या कामाबद्दल असो.  
 
वैयक्तिक जीवनाबद्दलच्या गोष्टी तो पोस्ट करतो    
शाहरुख आपल्या फॅन्ससाठी आपल्या जीवनाशी निगडित बर्‍याच घटनांबद्दल आपल्या चाहत्यांशी शेअर करतो. शाहरुखने आपला सर्वात लहान मुलगा अबरामचे फोटो सर्वात आधी ट्विटरवरच शेयर केले होते. त्याशिवाय बरेच असे काही क्षण जे त्याच्या जीवनात फार खास आहे ते ही तो ट्विटरवर आपल्या चाहत्यांसोबत शेअर करतो.  
 
शाहरुख सध्या आपले येणारे चित्रपट 'फॅन'च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटात तो डबल रोलमध्ये दिसणार आहे. शाहरुखने एका विधानात सांगितले होते की प्रेक्षकांना त्याचे चित्रपट पसंत पडेल आणि त्याच्या लहान फॅन्सला देखील तो फार आवडेल असा माझा विश्वास आहे.