शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 10 सप्टेंबर 2014 (11:42 IST)

श्वेता प्रसादला बॉलिवूडची ऑफर

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री श्वेता प्रसाद हिचे नाव पोलिसांनी देहविक्री प्रकरणी रंगेहाथ पकडल्यानंतर पुन्हा एकदा प्रकाशझोतात आले. पण, परिस्थितीमुळे आपण या फंद्यात फसलो असे सांगणार्‍या श्वेताला बॉलिवूडमधून आता मात्र मदतीचा हात मिळतो आहे. आपल्या आगामी चित्रपटात काम करण्याची संधी सिनेनिर्माते हंसल मेहता यांनी श्वेताला दिली आहे. ‘मी श्वेताला आपल्या आगामी सिनेमात एका भूमिकेचा प्रस्ताव देऊ इच्छितो.

मकडी सिनेमात तिने उत्तम अभिनय केला होता’ असे मेहता यांनी टिटरवर म्हटले आहे. सोबतच, श्वेता हिचे फोटो टाकणे बंद करा आणि त्या दलालांचे आणि श्रीमंतांचे फोटो टाका जे श्वेताचे ग्राहक बनले होते. दुबळ्या व्यक्तीला निशाणा न बनवता बदमाशांचा पर्दाफाश करा, असे आवाहन देखील हंसल मेहता यांनी केले आहे.