गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , शनिवार, 5 सप्टेंबर 2015 (10:38 IST)

संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे निधन

'चलते चलते', ' बाबुल', 'बागबान', 'कभी खुशी कभी गम', 'राजनीति' 'देव' यांसारख्या चित्रपटास संगीत देणारे सुप्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव (वय ५१)यांचे कॅन्सरमुळे निधन झाले.

अंधेरी  येथील कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये  ४० दिवसापासून त्यांच्यावर उपचार सुरु होते.  आजार बळावल्यामुळे डॉक्टरांनी त्यांच्यावरील कीमोथैरेपी उपचार बंद केले होते. त्यांच्या पश्चात  दोन मुले आहेत.