शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 16 जानेवारी 2016 (11:33 IST)

संजय लीलाच्या नव्या चित्रपटात दीपिका

दीपिका पदुकोण संजय लीला भन्साळी यांच्या ‘रामलीला’, ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटात काम केल्यानंतर त्यांच्या तिसर्‍या चित्रपटातही झळकणार आहे. ‘गुस्ताखींया’ असे या आगामी चित्रपटाचे नाव असून प्रसिध्द साहित्यिक साहिर लुधियानवी आणि अङ्क्रिता प्रीतम यांच्या खर्‍या आयुष्यातील रोमान्सवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या भूमिकांसाठी यापूर्वी इरफान खान आणि प्रियांका चोप्राची निवड झाल्याच्या बातम्या पसरल्या होत्या. पण एका न्यूज पोर्टलने दिलेल्या बातमीनुसार दीपिका पदुकोण आणि इरफान या भूमिका साकारणार आहेत. ‘गुस्ताखींया’ हा दीपिका आणि इरफान जोडीचा पीकूनंतरचा दुसरा चित्रपट असेल. असे जर नीट घडून आले तर संजय लीला भन्साळींचा दीपिकासोबतचा ‘गुस्ताखींया’ तिसरा ब्लॉकबस्टर चित्रपट ठरू शकतो.