शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated :मुंबई , गुरूवार, 18 डिसेंबर 2014 (16:21 IST)

सचिनने आमिरसह पाहिला 'पीके' पहा फोटो....

परफेक्टनिस्ट आमिर खानचा 'पीके' चित्रपट इतरांपेक्षा वेगळा आहे. चित्रपटाची कथा भन्नाट आहे. आमिरच्या अभिनयामुळे त्याद्वारे सशक्त सामाजिक संदेश देण्यात आल्याची स्तुती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केली आहे. 'पीके'च्या स्पेशल स्क्रीनिंगच्या वेळी सचिन तेंडुलकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, स्वत: आमिर खान, दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि अनुष्का शर्मा अशी मंडळी उपस्थित होती. अर्धनग्न अवस्थेत ट्रान्झिटर हाती घेतलेल्या पोस्टरमुळे 'पीके' चित्रपटाला वादाची फोडणी मिळाली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. मात्र याचा 'पीके'च्या पूर्वप्रसिद्धीवर कोणताही परिणाम होत नसल्याचे दिसून येत आहे.आमिर खान आपल्या संपूर्ण टीमसह देशभरात पीकेची प्रसिद्धी करीत आहे. पीकेच्या स्पशेल स्क्रीनिंगच्या वेळी राजकारणी आणि क्रिकेटपटूंना आपल्याकडे ओढत आमिर खानने बॉलीवूडमधील उर्वरित खान मंडळींवर एकप्रकारे कुरघोडी केल्याची चर्चा सुरू आहे. पीकेच्या स्पेशल स्क्रीनिंगच्या वेळी शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरेही उपस्थित होते.
सचिनची बायको अंजलि तेंडुलकरने देखील बघितली पीके
बर्‍याच दिवसांनंतर अनुष्का आणि हिरानी यांचे चित्रपट रिलीज होत आहे ...
राज ठाकरेपण चित्रपट बघण्यासाठी पोहोचले
किरणला पसंत आवडली पीके
किकचे दिग्दर्शक साजिद खान
अयान मुखर्जी
गायत्री जोशी