बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सनीला घेतल्याने सोनाक्षी नाराज!

‘नूर’ या चित्रपटात अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा काम करीत आहे. पण आता निङ्र्कात्यावर ती थोडी नाराज झाली आहे. कारण सनी लिओनची ‘नूर’ मध्ये एन्ट्री झाली आहे. सोनाक्षी या चित्रपटात पत्रकाराची भूमिका साकारत आहे. सबा इम्तियाज यांच्या ‘कराची यू आर किलिंग मी’ या कादंबरीवर आधारित हा चित्रपट आहे.
 
‘नूर’ मध्ये सनी लिओनला भूमिका देण्याचा निर्णय झाला असून तिची भूमिका मोठी नसली तरी सनीमुळे चित्रपटाची रंगत वाढू शकते, असा कयास निर्मात्याचा आहे.  ‘नूर’ मध्ये सनी लिओन चार दिवसांचे शूटिंग करणार आहे. हे शूटिंग 11 ऑगस्टपासून सुरू होणार असल्याचे समजते. आजपर्यंत सेक्सी अदांचा जलवा दाखवलेल्या सनीला या चित्रपटात कसदार अभिनय करावा लागणार आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार सोनाक्षी सिन्हा सनीसोबत काम करण्यास तयार नव्हती. तिला ही बातमी समजताच ती नाराज झाली. पण निर्मात्याने सोनाक्षीची समजूत काढली आणि ती तयार झाली. दोघींचे काही एकत्र सीन्स असतील. सुशील सिप्पी दिग्दर्शन करीत असलेला ‘नूर’ हा चित्रपट 7 एपिल्र रोजी प्रदर्शित होणार आहे.