शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सलमान खानलाही हनीमूनला सोबत नेणार

शनिवारी मुंबईत बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बसू आणि अभिनेता करणसिंग ग्रोव्हर यांचा शानदार विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्याला सिनेसृष्टीतल्या अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली. त्यावेळी सलमान खानसुध्दा दोघांना शुभेच्छा देण्यासाठी लग्नात पोहोचला होता.
 
बिपाशा आणि करणने सलमानसोबत मीडियाला लग्न सोहळ्यानंतर फोटोग्राफ्ससाठी पोज दिल्या. सलमान खान याला हनीमूनवर घेऊन जाणार असल्याचे अभिनेत्री बिपाशा बसू हिने म्हटले आहे. यानंतर मीडियाने सलमान खानला विचारले की, बिपाशा आणि करण यांच्या जोडीबाबत काय सांगशील? त्यावर सलमान म्हणाला की, ही जोडी खूप चांगली आहे आणि माझी इच्छा आहे, की ही जोडी टिकावी. महत्त्वाचे आहे हे नाते टिकणे. बिपाशासोबत लग्नापूर्वी करणने दोनवेळा लग्न केले आहे आणि त्याचा दोनवेळा घटस्फोट झाला आहे. इतकेच नाही तर ज्यावेळी सलमान खानला विचारले की तू लग्न कधी करणार? त्यावेळी बिपाशाने म्हटले की, सलमानने लग्न करू नये, अशी माझी इच्छा आहे. मी सलमानची चांगली मैत्रीण आहे, तो जगभरातील तरुणींच्या हृदयाची धडकन आहे. त्याने लग्न करू नये, केवळ आनंदी राहावे.