शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सलमान नाराज....दबंग 3 तून सोनाक्षी बाहेर...

आता अरबाज खान 'दबंग 3' बनवण्याच्या मूडमध्ये आहे. स्क्रिप्ट, कलाकार आणि लोकेशनवर काम सुरू आहे कारण सलमानच्या डेट्स मिळत्याक्षणी शूटिंग सुरू करता येईल. या सर्वात एक धक्कादायक बातमी म्हणजे दबंग 3 हून सोनाक्षीला बाहेर ठेवण्यात येणार आहे.
 
सूत्रांप्रमाणे अरबाज आणि सलमान सोनाक्षीवर चिडलेले आहेत. अरबाजने तिला 'डॉली की डोली' ऑफर केली होती पण सोनाक्षी नकार दिला आणि सोनमला हा सिनेमा मिळाला. नंतर सोनमने सलमानसोबत 'प्रेम रतन धन पायो' मध्येही प्रमुख भूमिका साकारली.
हे तर सर्वांनाच माहीत आहे की सलमान एकदा रागावला की समोरच्याचं काही खरं नाही. यामुळे त्याला आता सोनाक्षीसोबत काम करायचे नाही.
 
तसे यामागे एक कारण असेही असल्याची चर्चा आहे की दबंग 3 'दबंग' चा प्रीक्वल असेल. त्यामुळे यात सोनाक्षीचं काही कामच नाही. म्हणूनच अरबाज दबंग 3 साठी नवीन चेहरा शोधत आहे.