गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 26 सप्टेंबर 2014 (13:49 IST)

सलमानचे अँब्स खोटे?

बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान आपल्या फिटनेसमुळे तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. बॉलिवूडमधील अनेक स्टार सलमानकडून फिटनेस टिप्सही घेताना दिसतात. इतकंच काय तर सुरुवातीला बॉलिवूडमध्ये सिक्स पॅक अँब्ज असणारा सलमान हा एकमेव अभिनेता होता. पण अनेकांना भुरळ घालणारे सलमानचे हे अँब्ज खोटे आहेत, असं सांगितल्यावर धक्का बसेल ना? आजच्या टेक्नॉलॉजीच्या युगात असे अँब्ज दाखवणं शक्य आहे. विशेष म्हणजे ‘एक था टायगर’ या सिनेमात सलमानने दाखवलेले सिक्स पॅक अँब्ज खोटे आहेत.

काही दिवसांपूर्वीच एका ग्राफिक्स कंपनीमधील माजी कर्मचार्‍याने ‘यू-ट्यूब’ वर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये सलमान खानचे खोटे अँब्स दिसत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सलमानने खोट्या अँब्सचा वापर ‘एक था टागर’ चित्रपटासाठी केला होता. सलमान खानचा सिनेमा आणि शर्टलेस सीन नाही, असं होणं जवळपास अशक्यच आहे. ‘एक था टागर’साठी सलमान खान ‘शर्ट लेस’ सीन देणार होता. मात्र दिग्दर्शक कबीर खानने सीनच सिनेमातून वगळल्याचं सलमानला कळलं. सिनेमात शर्टलेस सीन नसेल तर माझे फॅन्स नाराज होतील. तसंच ब्रॅण्ड असलेल्या सलमानच्या इमेजलाही धक्का पोहोचेल, असं सांगत सल्लूने चित्रपटात या सीनची मागणी केली. त्यामुळे त्या सीनमध्ये कॉम्प्युटर ग्राफिक्सच्या साहाय्याने त्याचे अँब्ज दाखवण्यात आले होते, असं माजी कर्मचार्‍याने एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.