मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 28 नोव्हेंबर 2015 (09:40 IST)

सलमानने आणलं, मात्र त्याच्यावर अवलंबून नाही

बॉलिवूडमध्ये सलमान खानमुळे आले. किंबहुना सलमान खानमुळेच अभिनेत्री होऊ शकले. मात्र, कामासाठी सलमानवर अवलंबून राहू शकत नाही, असं वक्तव्य अभिनेत्री जरीन खान हिने केलं आहे. या इंडस्ट्रीचा भाग बनवल्याबद्दल सलमानचे मी कायम आभारी राहीन. मात्र, काम शोधण्यासाठी कायम 
 
सलमानचा आधार घेऊ शकत नाही, असेही जरीन म्हणाली. मला याचा आनंद आहे की, मला काहीही अडचण आल्यास सलमान खान नेहमी सोबत असतो. काहीही गरज लागल्यास एक कॉलमध्ये मदतीसाठी उभा राहतो. मात्र, याचा अर्थ असा नाही की, त्याच्याकडे सारखी मदत मागत राहायचं., असं जरीन म्हणाली.