शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

सिल्वेस्टर माझा आयडॉल: जॉन अब्राहम

हॉलिवूड सुपरस्टार सिल्वेस्टर स्टॅलोनचा बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमवर मोठा प्रभाव आहे. तो म्हणाला, सिल्वेस्टर स्टॅलोन माझ्यासाठी आदर्श व्यक्ती असून माझ्यात स्टॅलोनचा अंश असल्याचे मी मानतो, असे जॉन म्हणतो.

जॉन म्हणाला, स्टॅलोन माझ चित्रपटात येण्याचे कारण आहे हे काही जणांना माहिती आहे. मी ‘रॉकी 4’ हा चित्रपट पाहिला होता आणि त्या चित्रपटाचा माझ्यावर मोठा प्रभाव पडला. एखादा माणूस इतका शक्तिशाली असू शकतो आणि दुसर्‍या शक्तिशाली माणसाशी लढू शकतो याचा माझ्यावर जास्त प्रभाव पडला. तो पुढे म्हणाला, मलाही शक्तिशाली व्हावे असे वाटले. माझे वजन वाढवण्यासाठी मी खायला सुरुवात केली. त्यावेळी मी कॉलेजात शिकत होतो. जॉनचा आगामी चित्रपट ‘फोर्स 2’ आहे. यात त्याच्यासोबत सोनाक्षी सिन्हा काम करीत आहे.