गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 जुलै 2015 (11:05 IST)

सोनमने घेतले 30 कोटींचे घर

श्रद्धा कपूर, आलिया भट्ट यांच्या पावलावर पाऊल टाकून सोनम कपूरनेही आईवडिलांपासून दूर स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी आलिया आणि श्रद्धा घराच्या शोधात अजूनही असताना सोनम कपूरने मात्र घर मिळविण्यात आघाडी घेतली आहे. तिने गेल्याच महिन्यात बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये डुप्लेक्स अपार्टमेंट खरेदी केले आहे. 
 
7 हजार चौरस फुटांच्या या घरासाठी सोनमने तब्बल 30 कोटी रूपये मोजले असल्याचेही समजते. हे घर घेण्यामागे या बिल्डिंगमध्ये असलेले मिनी थिएटर हे मुख्य कारण असल्याचेही सांगितले जात असून येथे सोनम तिच्या चित्रपटांचे स्क्रिनिंग ठेवू शकेल. सध्या या घराच्या इंटिरियरचे काम सुरू आहे आणि सोनम मावशी कविता सिंह हिच्यासोबत घरासाठीची खरेदी करताना दिसते आहे. 
 
सोनमला या घरात शिफ्ट होण्यासाठी अजून 1 वर्ष लागेल असेही सांगितले जात आहे. याच बिल्डिंगमध्ये उद्योजक गौतम अडानी, सिटी बँकेचे माजी प्रमुख विक्रम पंडित, इरोज एन्टरटेनमेंटचे प्रमुख किशोर लुल्ला अशा प्रसिद्ध असामींचीही घरे आहेत.