शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 29 ऑक्टोबर 2014 (12:03 IST)

सोनाक्षीने बदलली हेअरस्टाइल

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ऑफस्क्रिन आपल्या ग्लॅमरस लूकसाठी नेहमीच चर्चेत असते. सोनाक्षी सध्या विविध ङ्खॅशन करते. परंतु आता तिने वेगळी हेअरस्टाइल करून सर्वाना आश्चर्यचकित केले आहे.
 
सोनाक्षीने अलीकडेच आपली काही छायाचित्रे सोशल साइटस्वर अपलोड केली आहेत. या छायाचित्रांत सोनाक्षीचा हेअरकट बदलेला दिसतो. तिने आपले केस कापले आहेत आणि स्टालीश बॉब कट केली आहे. सोनाक्षीने आपल्या टिटरवर ही छायाचित्रे अपलोड करून लिहिले की, ‘खूप वर्षानी छोटे केस..!’ सोनाक्षीचा हा हेअरकट क्रोमाके सलूनची हेअर ड्रेसर कांता मोटवणी यांनी केली आहे.
 
सोनाक्षीचा हा लूक कोणत्या सिनेमासाठी आहे, हे अद्याप कळालेले नाहीये. तिने केवळ लूक बदलण्यासाठी हेअरकट केली आहे, हेदेखील स्पष्ट झालेले नाहीये. असो, परंतु हा नवीन लूक सोनाक्षीला शोभतोय हे नक्की.