मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

सोनाली कुलकर्णीला बॉलिवूडची 'ऑफर'

PR
घार्‍या डोळ्यांची, कमनीय बांधा व गोर्‍यापान रंगाची '‍अप्सरा' अर्थात 'नटरंग' फेम सोनाली कुलकर्णी लवकरच बॉलिवूडच्या दरबारीही अवतरणार आहे. नृत्यनिपुणतेमुळे तसेच कॅमेरा प्रेझेन्स असल्याने आता दिला हिंदी चित्रपटासाठी विचारणा झाली आहे. 'नटरंग', 'अजिंठा' या यशस्वी मराठी चित्रपटांमध्ये अभिनय, नृत्यातून सौंदर्याची छाप पडलेल्या सोनालीला हिंदी चित्रपटात काम करण्याची ऑफर चालून आली आहे, मात्र या चित्रपटात काम करणार की नाही, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याचे तिने सांगितले.

या चित्रपटाचे नाव, दिग्दर्शक इत्यादी माहिती गुलदस्तयात असली तरीही यामध्ये अप्सरेसोबत नाना पाटेकर दिसणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोनालीने सादक केलेली 'नटरंग'मधील 'अप्सरा आली' ही लावणी अतिशय गाजली.