शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 21 नोव्हेंबर 2014 (15:34 IST)

सोशल साइटस्वर अर्पिताच्या लग्नाचा बोलबाला

सोशल नेटवर्किग साइटस्वर सलमान खानची बहीण अर्पिताच्या लग्नाची छायाचित्रे बरीच शेअर झालीत. या फोटोंना खूप लाइक्सदेखील मिळाले आहेत. बॉलिवूड सेलेब्सनी अर्पिता-आयुषला लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. एवढेच नव्हे लग्नात सामील झालेल्या सेलेब्सनी सलमान खान, पार्टी, आयुष-अर्पितासोबतची छायाचित्रे सोशल नेटवर्किग साइटस्वर शेअर केलीत. बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा पार्टीदरम्यान सानिया मिर्झा आणि मधुर भांडारकरसोबत दिसत आहे.
 
‘जय हो’ सिनेमात सलमान खानची को-स्टार डेजी शाहने आयुष आणि अर्पितासोबतचे छायाचित्र टिटरवर पोस्ट केले आहे. एक था टायगर फेम कबीर खानने तीन फोटो आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केली आहेत. शिवाय, त्याची पत्नी मिनी माथुरनेसुध्दा अर्पितासोबतची छायाचित्रे आपल्या ट्विटरवर शेअर केली आहेत. प्रियांका चोप्राने ट्विटरवर फोटो पोस्ट करून लिहिले, मेरे यार की शादी थी. अर्पिता मी तुला या गाण्याप्रमाणेच खूप-खूप शुभेच्छा देते. बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुखनेसुध्दा आपल्या ट्विटर अकाऊंटवर अर्पिता आणि आयुषला शुभेच्छा दिल्या.