शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मुंबई , मंगळवार, 27 जानेवारी 2015 (08:48 IST)

'सोहा-कुणाल' लग्नाच्या बेडीत!

अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करणारे बॉलीवूडमधील हॉट कपल सोहा अली खान व कुणाल खेमू रविवारी मुंबईत पार पडलेल्या एका खासगी समारंभादरम्यान लग्नाच्या बेडीत अडकले. सोहाची आई शर्मिला टागोर, भाऊ सैफ अली खान, करिना कपूरसह कुटुंबातील जवळचे नातेवाईक या सोहळय़ास उपस्थित होते. गतवर्षी पॅरिसमध्ये या दोघांचा साखरपुडा झाला होता.