शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|
Last Updated : शनिवार, 1 नोव्हेंबर 2014 (10:45 IST)

सौंदर्या तुझं नाव ऐश्वर्या राय

माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय बच्चनचा आज (एक नोव्हेंबर) 41 वा  वाढदिवस आहे. तिचे हसरे व्यक्तिमत्त्व आणि नाजूक शरीरयष्टी पाहून तिने आज अडतीस वर्ष पूर्ण केले आहे यावर विश्वासच बसत नाही कारण ऐश अजूनही आकर्षक वाटते. लग्न झाल्यानंतरही तिची मोहकता कायम आहे हे विशेष. 'ती पाहताच बाला कलिजा खलास झाला' हे तिच्याकडे आजही बघून वाटते यातच सारे काही आले. लवकरच आई होणा-या ऐश्वर्याला हा वाढदिवस स्मरणात राहील.

तारकांचे कुटुंब
ऐश्वर्याचे कुटुंब भारतातील 'स्टार' कुटुंब आहे. 'घरात हसरे तारे असताना मी पाहू कशाला नभाकडे' अशी तिची अवस्था झाल्यास नवल नाही. अमिताभ तर महानायक आहे. जया बच्चन यांनीही एक काळ गाजवला आहे. ऐश्वर्याचा नवरा अभिषेक करीयरच्या शिखरावर आहे. स्वतः ऐश्वर्या तर काय? आंतरराष्ट्रीय पातळीवरची कलाकार बनली आहे. कॉन इंटरनॅशनल फेस्टिवलमध्ये परीक्षक म्हणून आमंत्रित करण्यात आलेली ती पहिलीच भारतीय कलावंत यातच काय ते आले. आणि आता तर ती एका कन्याची आई देखील झाली आहे. 

ऐशमागील शुक्लकाष्ठ
यश मिळत असतानाही ऐशच्या मागे काही शुक्लकाष्ट लागली आहेत. सलमान हे त्यातलं पहिलं शुक्लकाष्ट. ऐश्वर्याचा हा पहिला प्रियकर. आता तिच्यापासून लांब असला तरीही त्यांच्या जुन्या कहाण्या उकरून मीडीयावाले सतत दाखवत असतात.

'देवदास' नंतर ऐश व किंग खान यांच्यात दरी निर्माण झाली आहे. अमीर खान व ऐश यांच्यातील संबंधही काही फार चांगले नाहीत. मि. परफेक्शनिस्ट आमीर तब्बेतीत काम करतो. त्या उलट ऐश सतत धावपळीत असते. तिच्या डेट्स मिळविणे मुश्किल असते. त्यामळेच की काय ऐश-अमीर यांची जोडी पडद्यावर कधी झळकलीच नाही. अक्षय कुमार, गोविंदा, संजय दत्त, अजय देवगण व हृतिक रोशन यांच्यासोबत तर ऐश किती तरी चित्रपट करू शकते. त्यातल्या गोविंदा व संजय दत्त यांच्या करियरचा आता अस्त होत आला आहे. त्यामुळे तिला परफेक्ट नायक म्हणून तिचा नवरा अभिषेकशिवाय सध्या कुणीही नाही.

ऐशच्या वयाच्या काही नायिका आता घरच्या उद्योगाला लागल्या आहेत. राणी मुखर्जी, प्रीती झिंटा यांचे मार्केट डाऊन झाले आहे. सुष्मिता सेन ही ऐशची एकेकाळची प्रतिस्पर्धी. पण तीही आता स्पर्धेतून बाद झाली आहे. आता कॅटरीना कैफ, दीपिका पदुकोण व प्रियंका चोप्रा या नायिकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे.

असे असले ती मीडियामध्ये ऐश्वर्यावर लाइमलाइट नेहमीच पडतो. कधी सौंदर्य तर कधी बच्चन परिवाराची सून म्हणून ती कायम बातमीत असते. काही दिवसांपूर्वी ऐशच्या सुंदर डोळ्यांना 'जगातील सर्वात सेक्सी डोळे' ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.