शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By wd|
Last Modified: मुंबई , शुक्रवार, 19 सप्टेंबर 2014 (15:01 IST)

स्त्रीचे अंग बातमीचा विषय कसा होऊ शकतो- दीपिका

बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पादुकोण ही गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे.  'चेन्नई एक्स्प्रेस' चित्रपटाच्या ट्रेलर अनावरणावेळी दीपिकाने परिधान केलेल्या ड्रेसवरून चर्चा चांगलीच रंगली होती. त्यावर दीपिकाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्त्रीचे एखादे अंग बातमीचा विषय कसा होऊ शकतो, असे दीप‍िकाने म्हटले आहे. 
 
'चेन्नई एक्सप्रेस'च्या ट्रेलर अनावरणाच्या कार्यक्रमात दीपिका एक अश्लील फोटो एका वृत्तपत्राने वेबसाइटवर झळकवला होता. परंतु दीपिकाने यावर आक्षेप घेतला व आपली स्पष्टपणे भूमिकाही मांडली होती. नंतर दीपिकाला बॉलिवूडमधून पाठिंबाही मिळाला. मात्र, दीपिका एवढ्यावरच थांबली नाही तर तिने 'फेसबुक' ब्लॉग लिहून स्त्रीच्या शरीराचा एखादा भाग बातमीचा विषय कसा होऊ शकतो? असा सवालाही विचारला आहे. 
 
मी बॉलिवूडमध्ये काम करते. आमच्याकडून खूप अपेक्षा असतात. त्यामुळे जी भूमिका मी स्वीकारली असेल ती पूर्ण करणे माझे कर्तव्य आहे, एखाद्या भूमिका स्विकारायची की नाकारायची तो माझा निर्णय राहिल. असेही दीपिकाने ब्लॉगमध्ये म्हटले आहे. स्तन किंवा शरीराचा अन्य कोणताही भाग हा बातमीचा विषय होऊ शकत नाही. बातमी कोणत्या संदर्भात लिहिली जात आहे आणि ती बातमी विकण्यासाठी तिचा संदर्भ किती बदलला जात आहे हे महत्त्वाचे आहे, असे दीपिकाने म्हटले आहे.