गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 1 ऑक्टोबर 2014 (12:04 IST)

स्मोकिंग धोकादायकच.. पण तरीही..

खरे तर स्टार आपला फिटनेस आणि सौंदर्य टिकवण्यासाठी बरीच मेहनत घेत असतात. हेल्दी डाएट, व्यायाम हा त्यांच्या रुटीनचा महत्त्वाचा भाग असतो. मात्र काही वाईट सवयी अशा आहेत, ज्यापासून ते स्वत:ला दूर करू शकलेले नाहीत. उदाहरणार्थ, अभिनेत्री तनुजा आपल्या स्मोकिंगच्या सवयीमुळे त्रासलेल्या आहेत. काही दिवसांपूर्वी एका सार्वजनिक कार्यक्रमात त्या सिगारेट ओढताना कॅमेर्‍यात कैद झाल्या होत्या. बॉलीवूडचा किंग शाहरूख खानसुद्धा चेन स्मोकर्सपैकी एक आहे. स्मोकिंगच्या सवयीमुळे अनेकदा तो वादात अडकला आहे. काही वर्षांपूर्वी जयपूरमधील एका क्रिकेट सामन्यादरम्यान शाहरूख स्टेडियममध्ये स्मोक करताना आढळला होता. शाहरूख खान, तनुजा यांच्याव्यतिरिक्त राणी मुखर्जीसह बर्‍याच स्टार्संना खासगी आयुष्यात सिगारेट ओढण्याची सवय आहे.