शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By भाषा|

स्वप्न पूर्ण झालेः डॉ. शिल्पा शेट्टी

ब्रिटनमधील लीडस विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट ही पदवी मिळाल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीने 'ही पदवी म्हणजे माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

PTIPTI
एका विशेष कार्यक्रमात शिल्पाला मानद डॉक्टरेट प्रदान करण्यात आली. त्यानंतर बोलताना शिल्पा म्हणाली, या पदवीमुळे माझे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटते आहे. माझ्या आईला मी डॉक्टर व्हावेसे वाटत होते. आज या पदवीने त्यांची इच्छा पूर्ण झाली आहे. या पदवीमुळे माझा सन्मान झाल्याची भावना मनात दाटून आली आहे.

शिल्पा हा सन्मान मिळवणारी सर्वांत कमी वयाची अभिनेत्री ठरली आहे. यापूर्वी अमिताभ बच्चन, यश चोप्रा व शबाना आझमी यांनाच हा गौरव प्राप्त झाला आहे. या बड्या कलाकारांच्या पंक्तीत मला बसविले हाच माझ्यासाठी बहुमान असल्याचे शिल्पा म्हणाली.

अभिनयासाठी कधीही चर्चेत नसणारी शिल्पा यावर्षी जानेवारीत बिग ब्रदर हा दूरचित्रवाणी कार्यक्रमात विजेती ठऱली आणि अचानक तिच्याविषयीच्या चर्चेला उधाण आले. सद्या ती मिस बॉलीवूड या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट ऑक्टोबरमध्ये जर्मनी आणि नंतर ब्रिटनमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच झालेल्या आयफा सोहळ्यात तिला विशेष पुरस्काराने गौरविण्यात आले होते. याशिवाय रिचर्ड गेअर या अभिनेत्याने तिचे सार्वजनिक ठिकाणी चुंबन घेतल्यानतंरही त्याविषयी चर्चा झाली होती.