मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 3 सप्टेंबर 2014 (13:16 IST)

हृतिक चालवणार फॉम्रुला-वन कार

सिनेमा दिग्दर्शक आनंद ‘बँग बँग’ हा आगामी अँक्शन पॅक्ड सिनेमा बनवण्यात कोणतीच कसर सोडण्यात नाहीये. याची एक झलक सिनेमाच्या ट्रेलरमध्ये पाहायला मिळाली. ट्रेलरमधील अँक्शन सीक्वेन्सला पाहूनच अंदाजा लावला जात आहे, की हा हिंदी सिनेमातील बेस्ट अँक्शन सीक्वेन्सपैकी एक आहे. ताजी बातमी अशी, की सिनेमात हृतिक रोशन अबू धाबीच्या कॉलनीत ‘फॉर्मुला 1’ कार चालवताना दिसतो.
 
हृतिक रोशनने यावेळी बोलताना सांगितले, ‘मी आतापर्यंत अशी सवारी पाहिलेली नाहीये. हा माझ्या लाइफमधील सर्वात अनोखा अनुभव आहे. या स्मूथ रस्त्यांवर फॉम्रुला 1 गाडी चालवण्याची मजा काही औरच आहे. अबू धाबी इन्क्रेडिबल आहेत.’ तसेच, सिनेमा दिग्दर्शक सिध्दार्थ आनंदने सांगितले, ‘हिंदी सिनेमात आजपर्यंत ‘बँग बँग’सारखे अँक्शन सीक्वेन्स पाहायला मिळाले नाहीत. ‘बँग बँग’ अँक्शन सीक्वेन्स पूर्णत: नवीन आहेत. सिनेमाच्या टीजरने ते सिध्दही झाले आहे. हृतिकचा फॉर्मुला 1 कार चालवणे त्याच अँक्शन सीक्वेन्सपैकी एक आहे. हृतिक-कॅटरिना अभिनीत ‘बँग बँग’2 ऑक्टोबरला रिलीज होत आहे.