शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

हॉट कॉफीचा लेट नाईट शो

सिनेनिर्माता करण जोहर होस्ट करत असलेला ‘कॉफी विथ करण’ हा कार्यक्रम आता जरा जास्तच बोल्ड झालेला दिसतोय. कारण, आपल्या ‘बोल्डनेस‘मुळे या कार्यक्रमाला चक्क आपली वेळ बदलण्याची वेळ आलीय. नेहमी प्राईम टाईममध्ये प्रसारित होणारा ‘कॉफी विथ करण’ हा कार्यक्रम या आठवडय़ात मात्र लेट नाईट म्हणजे रात्री 11 वाजता प्रसारित होणार आहे.. आणि याला कारण म्हणजे अभिनेत्री नर्गिस फाकरी आणि फ्रिडा पिंटो..पहिल्यांदाच ‘कॉफी विथ करण’ हा कार्यक्रम इतका बोल्ड झालेला दिसतोय.

WD

या कार्यक्रमात फ्रिडा आणि नर्गिस आपल्या ‘बोल्डनेस’च्या सीमारेषेवर पोहोचलेल्या दिसतायत. या एपिसोडचा कंटेट इतका ‘अडल्ट’ आहे की तो प्राईम टाइमला दाखवला जाऊ शकत नाही, यामुळे चॅनलला कार्यक्रमाची वेळच बदलावी लागलीय. दोन्ही अभिनेत्री या शोमध्ये अतिशय फ्रँक होत्या आणि सेक्सबद्दल विचारलेल्या प्रश्नांना अतिशय बोल्डनेसने उत्तर दिलं. इतकंच नाही तर दोघींनी आपल्या नावाचा अर्थ दुसर्‍याच ‘बोल्ड’ भाषेत सांगितला.. जे ऐकून करण तर ‘थंड’च पडला..