गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शनिवार, 28 मे 2016 (13:03 IST)

‘उडता पंजाब’ सेन्सॉर बोर्डच्या कात्रीत

कोणत्याही कटशिवाय ‘उडता पंजाब’चा ट्रेलर एप्रिलमध्ये मंजूर केल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने आता सर्टिफिकेट देण्यास नकार दिला आहे. चित्रपटातील शिव्या आणि ड्रग्सच्या सीन्सवर बोर्डाने आक्षेप घेतला आहे. चित्रपटाचे सह-निर्माता अनुराग कश्यप यांनी परवानगीसाठी आता केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे दार ठोठावले आहे. येत्या 17 जून रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘उडता पंजाब’ हा पंजाबातील सर्वात मोठी समस्या ड्रग्स अँडिक्शन आणि तस्करीवर आधारित चित्रपट आहे. चित्रपटातील रॉकस्टार टोनी सिंहच्या भूमिकेत शाहिद कपूर आहे. तो ड्रग अँडिक्ट असतो. त्याला सर्वजण शिव्या देत असतात. यालाच बोर्डाने आक्षेप घेतला आहे. चित्रपटातील शिव्यांमुळे बोर्डाने सर्टिफिकेट देण्यास नकार दिला आहे. ‘उडता पंजाब’ मध्ये शाहिदसह करिना कपूर आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. 

या चित्रपटाचे ट्रेलर एप्रिलमध्ये रिलीज करण्यासाठी मंजूर झाले होते. एका आठवडय़ात या ट्रेलरला 1 कोटीपेक्षा जास्त हिटस् मिळाले आहेत.