मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 जुलै 2014 (15:35 IST)

‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या सिक्वेलने करिनाचे करिअर रुळावर येणार?

रोहित शेट्टीच्या चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये आजपर्यंत करिना कपूरला संधी मिळाली आहे. करिना कपूर खानच्या करिअरला लग्नानंतर ब्रेक मिळाला. तिचा मागील ‘गोरी तेरे प्यार में’देखील फ्लॉप झाला. त्यामुळे करिना सध्या एका हिट सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पुन्हा जम   बसवण्याचा प्रयत्न करत आहे. करिनाच्या या प्रयत्नाला यश मिळाले ते ‘सिंघम’च्या सिक्वेलमध्ये काजल अग्रवालऐवजी तिची सिनेमात निवड झाली आहे. रोहित शेट्टीला करिनाच्या निवडीबाबत विचारले असता त्याने सांगितले की, करिना नेहमी माझ्या सिनेमांच्या  सिक्वेलमध्ये असते. सुरुवातीला ‘गोलमाल रिटर्न्‍स’आणि आता ‘सिंघम रिटर्न्‍स’मध्ये ती दिसेल. रोहितचे सिनेमाच्या सिक्वेलमधील अभिनेत्रींच्या निवडीमागचे हे गणित पाहता दीपिकाच्या जागी ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या सिक्वेलमध्ये करिनाची निवड निश्चित मानली जात आहे. करिनाने देखील ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या सिक्वेलमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.