शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 13 फेब्रुवारी 2016 (11:24 IST)

‘जिस्म 3’ सगळ्यात बोल्ड सिनेमा असेल

अभिनेत्री-सिनेनिर्माता पूजा भट्टनं एक एरोटिक थ्रिलर सिनेमा बनवण्याचं आता मनावर घेतलंय. हा नवा सिनेमा म्हणजे, ‘जिस्म’ या सिनेमाचा तिसरा भाग असेल. ‘जिस्म 3’ नावानं बनणारा हा सिनेमा आजवरचा सर्वात बोल्ड सिनेमा असेल. यामध्ये तीन अभिनेता आणि एक अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसतील. हा सिनेमा 2017 मध्ये प्रदर्शित होईल, असं पूजा सांगतेय. पण, सध्या पूजा रिचा चड्ढा अभिनित ‘कॅबरेट’ या सिनेमाच्या निर्मितीत बिझी आहे. 2003 साली आलेल्या ‘जिस्म’ सिनेमात बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसले होते. 2013 साली आलेल्या याच्या सिक्वेलमध्ये सनी लिओननं बॉलिवूड सिने जगतात प्रवेश केला होता.