बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 27 मे 2015 (15:42 IST)

‘तनु वेड्स मनु रिटर्न्‍स’ला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद

बॉलिवूडची सध्या आघाडीची अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, तीच खरी बॉलिवूडची ‘क्वीन’ आहे. कारण कंगनाचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘तनु वेड्स मनु रिटर्न्‍स’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ‘तनु वेड्स मनु रिटर्न्‍स’ने प्रदर्शित झाल्यापासून दोनच दिवसांतच 25 कोटींची कमाई केली आहे.
 
या सिनेमाची चित्रपट समीक्षकांनीही स्तुती केली आहे. अनेक समीक्षकांनी या सिनेमाला चांगलं रेटिंग्जही दिलं आहे. केवळ 
 
समीक्षकांच्याच पसंतीस हा सिनेमा उतरला नाही, तर प्रेक्षकांनीही भरभरुन दाद दिली आहे. शुक्रवारी रिलीज झालेल्या या सिनेमाने आतापर्यंतची तब्बल 25.9 कोटी एवढी कमाई केली आहे. प्रदर्शनाच्या दिवशी म्हणजे शुक्रवारीच या सिनेमाने 8.75 कोटींची कमाई केली होती. तर शनिवारी 13.10 कोटींची कमाई केली. भारतात ‘तनु वेड्स मनु रिटर्न्‍स’ने एकूण 21.85 कोटींची कमाई केली आहे, तर परदेशात 3.25 कोटींची कमाई केली आहे. ‘तनु वेड्स मनु रिटर्न्‍स’चे दिग्दर्शक आनंद रॉय हे आहेत. रॉय यांच गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘रांझणा’ सिनेमालाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला होता.