शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मे 2015 (14:18 IST)

‘बाजीराव मस्तानी’साठी रणवीरची प्रचंड मेहनत

‘रामलीला’नंतर बाजीराव मस्तानी या सिनेमामध्ये पुन्हा एकदा संजय लीला भन्साळीसोबत अभिनेता रणवीर सिंह काम करत आहे. भन्साळी यांच्या या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित सिनेमातील बाजीरावाची व्यक्तिरेखा अजरामर व्हावी यासाठी रणवीर सिंह प्रचंड मेहनत घेताना दिसतो आहे. बाजीराव मस्तानी हा इतिहासावर आधारित आहे. बाजीराव आणि मस्तानी यांच्या अजरामर ऐतिहासिक प्रेमकहाणीवर आधारित या सिनेमाची कथा आहे. यामध्ये रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा मुख्य भूमिकेत आहे. बाजीराव यांची भूमिका मला साकारायची होती, त्यामुळे या सिनेमाच्या निमित्ताने ते स्वप्न पूर्ण झालं. शिवाय हा सिनेमा चरित्रात्मक असल्याने आव्हान आहे. बाजीराव यांच भूमिकेची जबाबदारी माझ्यावर दिली, ही खरंच माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे, असे रणवीर सिंह म्हणाला. बाजीराव मस्तानी या सिनेमासाठी सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय यांना सिनेमात घेण्याची संजय लीला भन्साळी यांची इच्छा होती. मात्र ते शक्य न झाल्याने रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांना या सिनेमात प्रमुख भूमिका दिल्या आहेत.