गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 2 सप्टेंबर 2015 (10:03 IST)

‘बाहुबली’ला मिळू शकते ऑस्करचे नामांकन?

भारतीय चित्रपट कारकीर्दीत सर्वात जास्त गल्ला एस.एस. राजमौली यांच्या प्रसिद्ध चित्रपट ‘बाहुबली’ने जमविल्यामुळे या चित्रपटाचे येत्या 88 व्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी भारताकडून नामांकन मिळण्याची शक्यता आहे.
 
ऑस्कर पुरस्कारासाठी 25 सप्टेंबर रोजी निवडण्यात येणार्‍या भारतीय चित्रपटांच्या यादीत बाहुबलीचे नाव आहे. तेलुगू फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सने बाहुबलीचे नाव सुचविले. या चित्रपटाची भारताकडून निवड झाली तर तब्बल 29 वर्षानंतर तेलुगू फिल्म इंडस्ट्रीतर्फे ऑस्कर पुरस्कारासाठी जाणारा बाहुबली पहिला चित्रपट ठरेल. यापूर्वी के. विश्वनाथ आणि कमल हासन यांच्या ‘स्वाति मृत्यम’ या चित्रपटाला हा मान मिळाला होता. या वर्षी ऑस्करसाठी निवडण्यात येणार्‍या भारतीय चित्रपट निवड समितीचे प्रमुख अमोल पालेकर आहेत.