शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 जुलै 2015 (10:57 IST)

‘मन्नत’च्या भिंतीवर चाहत्याकडून ग्राफिटी पेंट

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या वांद्रयातील ‘मन्नत’ बंगल्याबाहेरील भिंतीवर अज्ञाताने ग्राफिटी पेंट केली आहे. विशेष म्हणजे यानंतर शाहरुखचा चरपपरीं बंगला टि्वटरवर टॉप ट्रेण्डमध्ये आला.
 
बॅण्डस्टॅण्ड इथल्या शाहरुखच्या चार मजली बंगल्याबाहेरच्या भिंतीवर ’Love you SRK’ आणि c u on 15th असा मेसेज लिहिला आहे. शिवाय मेसेजखाली ‘गौरव’ नाव लिहिलं आहे. मात्र हा मेसेज कोणी आणि का लिहिला, तसंच यामधून त्याला किंवा तिला काय सूचित करायचं आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 
 
दरम्यान ही ग्राफिटी कोणी पेंट केली याबाबत कल्पना नसल्याचं सुरक्षारक्षकांनी सांगितलं. तसंच शाहरुखच्या परवानगीशिवाय भिंतीला हात लावणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. परंतु ही ग्राफिटी कव्हर करावं असं त्यात काहीही गैर लिहिलेलं नाही. पण बॉस इथे नाहीत आणि ते 20 दिवसांनंतर परतणार आहेत. त्यांनी ग्राफिटी पुसण्याचा आदेश दिल्यानंतरच आम्ही ते काम करू, असं सुरक्षारक्षकांनी सांगितलं.‘