शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 2 एप्रिल 2015 (10:27 IST)

‘माय चॉइस’ वर सोनाक्षीचं मत थोडं वेगळं

अभिनेत्री दीपिका पदुकोणची शॉर्ट फिल्म ‘माय चॉइस’वर कौतुकाचा वर्षाव होत आहे. बॉल‍ीवूडपासून मीडियामध्ये प्रत्येक जण दीपिका आणि होमी अदजानिया यांच्या प्रयत्नांचं स्वागत करत आहे. पण बॉलीवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा मात्र याच्याशी सहमत नाही. तिने दीपिकाच्या या शॉर्ट फिल्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

मुंबईत एका कार लॉन्च कार्यक्रमात सोनाक्षीने दीपिकाच्या माय चॉइस या शॉर्ट फिल्मचं कौतुक केलंच पण त्यावर यातील काही मुद्द्यावर कठोर मतही व्यक्त केलं. सोनाक्षी म्हणाली की, मी हा व्हिडिओ अजून पाहिलेला नाही, पण याचा मूळ मुद्दा महिला सशक्तीकरण आहे. हा एक चांगला प्रयत्न आहे. परंतु ज्या महिला स्वातंर्त्यापासून दूर आहेत, त्यांना आपण ज्या काळात आहोत, तिथे आणणं हे खर्‍या अर्थाने सशक्तीकरण आहे. सशक्तीकरण फक्त कपडे घालण्याचं स्वातंर्त्य आणि सेक्ससाठी स्वत:ची मर्जी यापर्यंत मर्यादित नाही, तर रोजगार आणि स्वावलंबन याच्या महत्त्वाच्या बाजू आहेत.

एकीकडे दीपिकाच्या या व्हिडिओचं सगळीकडे कौतुक होत असताना, सोनाक्षी सिन्हाने या व्हिडिओबाबत महत्त्वाची आणि मोठी भूमिका घेतली आहे.