गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 29 जून 2015 (14:04 IST)

‘हर्षाली’ निर्मात्यांच्या कैदेत

अभिनेता सलमान खानचा आगामी सिनेमा ‘बजरंगी भाईजान’ मध्ये जी लहान मुलगी दिसते, तिला लपवण्यात आलं आहे. सिनेमाच्या प्रदर्शनानंतरच हर्षाली मल्होत्राला सार्वजनिक ठिकाणी जाण्याची परवानगी दिली आहे. ‘बजरंगी भाईजान’ सिनेमात मूकबधिर असलेली ही मुलगी चुकून भारताच्या सीमेत येते आणि तिला पुन्हा पाकिस्तानात सोडण्याची जबाबदारी सलमान खान स्वत:वर घेतो. सूत्रांच्या माहितीनुसार, सलमान खान आणि दिग्दर्शक कबीर खान हर्षालीला जाणीवपूर्वक सार्वजनिक ठिकाणी जाण्यास देत नाहीत. या चित्रपटात तिची महत्त्वाची व्यक्तिरेखा आहे आणि कोणताही निर्माता हर्षालीला भेटू नये, अशी दोघांचीही इच्छा आहे. सिनेमाच्या निर्मात्यांनी हर्षालीच्या आई-वडिलांसोबत एक कॉन्ट्रॅक्ट केलं आहे. या कॉन्ट्रॅक्टनुसार सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी हर्षाली पब्लिक किंवा मीडियाशी बातचीत करणार नाही. हर्षालीने शाळेच्या सुटीदरम्यानच सिनेमाची शूटिंग पूर्ण केली होती, जेणेकरुन तिच्या अभ्यासावर परिणाम होणार नाही. कबीर खानच्या दिग्दर्शनात बनलेल्या या सिनेमात सलमान खानसह, करिना कपूर आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची महत्त्वाची भूमिका आहे. ‘ईद’ला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.