शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 सप्टेंबर 2016 (17:39 IST)

पुस्तक परिचय : ओळख राष्ट्रीय प्रतीकांची

‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ या पुस्तकात लेखक मंगेश विठ्ठल कोळी या लेखकाने संकलित केलेल्या राष्ट्रीय प्रतीकांच्या बारीक सारीक तपशिलासह वर्णन केलेल्या प्रतीकांचे वाचन करतांना एक वेगळाच आनंद मिळतो. मुळात भारतभूमीबद्दल अपार प्रेम असणारी आपण भारतीय मंडळी, देश व देशातल्या गोष्टींचे वर्णन लिहिताना वा वाचतांना आपणाला एक प्रकारचे स्फुरण चढते असे म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यांत आपल्या मातृभूमितील मातृभूमीची ‘अस्मिता’ वैशिष्टये ठरणा-या महत्वपूर्ण गोष्टींचे महत्वपूर्ण संकलन वाचतांना खरोखरीच आनंदाला मोहोर येतो. मग ते आंबा या राष्ट्रीय फळांचे वर्णन असो वा कमळ या फुलाचे किंवा वटवृक्षाचे.
 
राष्ट्रध्वज-तिरंगा, राष्ट्रीय भाषा-हिंदी, टागोरांचे जनगणमन वा बंकिमचंद्राचे वंदेमातरम. राष्ट्रीय खेळ-हॉकी, राष्ट्रीय प्राणी-वाघ, याच बरोबर गंगा, रुपया, अशोक स्तंभ. देवनागरी राष्ट्रीय लिपी, सत्यमेव जयते हे घोषवाक्य इत्यादी  गोष्टी नित्यपरिचयाच्या व नेहमी ओठावर असल्यातरी त्याबद्दलची तपशीलवार माहिती फारच थोडयांना असते. पण वरील सर्व गोष्टींवर आपण अपार प्रेम करीत असल्यामुळे त्यांच्या बद्दलची इत्यंभूत माहिती वाचतांना खरोखरच ‘अलिबाबाची गुहा’ सापडल्याचा आनंद आपणाला होतो. 
 
कथा - कादंब-या अफाट झाल्या, विपुल काव्य निर्मिती झाली मात्र ज्या गोष्टींची माहिती प्रत्येक भारतीयाला असलीच पाहिजे असे साहित्य किती निर्माण झाले आहे? या दृष्टीकोनातून विचार करता लेखक मंगेश विठ्ठल कोळी यांनी ‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ या विषयावर संकलन करून एक फार मोठी पोकळी भरून काढून एक मोलाची साहित्यकृती निर्माण केली आहे असं मी म्हणेन.
 
बरेचदा आपण पाहतो, वाचतो, ऐकून घेतो, विसरतो पण ‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ हे पुस्तक त्या पलीकडचा ठरणार आहे. कारण एकदा का आपण हे वर्णन वाचल की ते कोणत्याही प्रकारानं विसरलं जाणार नाही याची मला शंभर टक्के खात्री वाटते. विद्यार्थी, शिक्षक, वक्ते, राजधुरीण या सर्वासर्वांना हा विशेषांक अत्यंत उपयुक्त ठरेल म्हणून ‘ज्ञानाचा दीपस्तंभ’ असं वर्णन या संकलनाचं केल्यास अतिशोयक्ती ठरणार नाही. या लेखक मंगेश विठ्ठल कोळी यांच्या हातून अशीच अधिकाधिक मौलिक साहित्य सेवा घडो असा शुभाशीर्वाद देतो. 
 
मला खात्री आहे की, ‘ओळख राष्ट्रीय प्रतीकांची’ हे पुस्तक वाचक, विद्यार्थी, शिक्षक, पालक या सर्वांना नक्कीच आवडेल व त्यांच्या ज्ञानात भर घालणारा ठरेल. तसेच विविध स्पर्धा परीक्षा देणा-या स्पर्धकांना सुद्धा या पुस्तकाची मोलाची मदत झाल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते.