testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बुध्दाचा कालखंड ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील

buddha purnima
काठमांडू| वेबदुनिया|

नेपाळमधील गौतम बुध्दाच्या जन्मस्थानावर पुरातत्त्व खात्याने शोधून काढलेल्या सर्वात जुन्यमंदिरामुळे असण्याबाबत पुष्टी मिळत आहे. युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून प्रसिध्द केलेल्या पवित्र मायादेवी मंदिराच्या परिसरात लुंबिनी येथे खोदकाम करण्यात आले.
या खोदकामात ख्रिस्तपूर्व सहाव्या शतकातील बांबूचा ढाचा आणि विटांमध्ये बांधलेली अनेक मंदिरे सापडली आहेत. ब्रिटनच्या डरहॅम विद्यापीठातील संशोधकांचे पथक रॉबिन कॉनींगहम यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असून बुध्दाच्या जीवनकाळातील सापडलेला हा पहिलाचा पुरातत्त्व मंदिराचा भाग असल्याचे सांगणत आले. बांबूच्या ढाच्यात मध्यभागी खुली जागा असून राणी मायादेवीने झाडाची फांदी हातात धरून लुंबिनी गार्डनमध्ये आपल्याला जन्म दिल्याची कथा बुध्दाने स्वत:च लिहून ठेवली आहे. भू-पुराणवस्तू संशोधकांनी या भागात पुरातन वृक्षाची मुळे असल्याचे म्हटले आहे.

लुंबिनी परिसरात यापूर्वी झालेल्या खोदकामात ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकापर्यंत अवशेष मिळाले होते. महाराजा अशोकने याच काळात सध्याच्या अफगाणिस्तानपासून बांगलादेशर्पत बौध्द धर्माचा प्रसार केल्याचे मानले जाते. बुध्दांच्या जन्मतारखेबाबत इतिहासकारांमध्ये मतमतांतरे आहेत. ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकात बुध्दांनी त्यांच्या विचारांचा प्रसार केला. वयाच्या 80 व्या वर्षी बुध्दांचा अंत झाल्याचे मानले जाते. आता नव्या संशोधनामुळे लुंबिनीचे महत्त्व आणखी वाढणार आहे.


यावर अधिक वाचा :

आत्मा न स्त्री असते न पुरूष

national news
जीवात्मा ही ना पुरूष असते ना स्त्री ना नपुंसक असते. ती जेव्हा शरीर धारण करते तेव्हाच तिचा ...

पाळा काही धार्मिक नियम

national news
शिव मंदिरात झांज वाजवू नये. सूर्य मंदिरात शंख आणि देवीच्या मंदिरात बासरी वाजवू ...

देवळात का जायचे?

national news
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ ऊर्जा असते. देवळे म्हणजे जणू काही ...

अन्न- संस्कार

national news
शुचिर्भूत होवून व्यक्ती ताटासमोर बसल्यावर प्रथम ताटाच्या मध्यभागी बरोबर समोर मीठ ...

स्वप्नात जर घुबड दिसला तर...

national news
स्वप्नात जर घुबड दिसला तर शुभ मानले जात नाही. अशी मान्यता आहे की स्वप्नात जर घुबड दिसला ...

राशिभविष्य