शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. बुद्ध जयंती
Written By

बुद्ध म्हणतात हे उपाय करून राग दूर होईल

भगवान बुद्ध यांच्याप्रमाणे संताप केल्याने मनुष्याचा चेहरा कुरूप होऊन जातो. त्याला दुख होतं, तो व्यक्ती चुकीचे कार्य करतो आणि त्याची संपत्ती नष्ट होते. संतापल्याने बदनामी होते. मित्र- नातेवाईक सोडून जातात. अशा प्रकारे अनेक संकटांना समोरा जावं लागतं.
 
भगवान गौतम बुद्ध यांच्याप्रमाणे राग किंवा संताप उत्पन्न झाल्यावर या 5 प्रकारे त्यापासून मुक्ती मिळू शकते.
1. मैत्री: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याशी मैत्रीची भावना असू द्या.
 
2. करुणा: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याच्याप्रती करुणेची भावना असू द्या.
 
3. मुदिता: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याच्याप्रती आनंदाची भावना असू द्या.
 
4. दुर्लक्ष: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याला दुर्लक्ष करण्याची भावना असू द्या.
 
5. कर्म: ज्या व्यक्तीप्रती राग उत्पन्न होत असेल, त्याबद्दल असा विचार करा की तो जो कर्म करतं आहे, त्याचे फल चांगले असो वा वाईट हे त्यालाच भोगावे लागतील.