बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 09
  4. »
  5. बजेट 09
Written By वार्ता|
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 16 फेब्रुवारी 2009 (16:03 IST)

बजेटमध्येही 'आम आदमी' केंद्रबिंदू

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सादर होत असलेल्या बजेटमध्ये 'आम आदमी'चा उल्लेख झाल्याशिवाय राहील काय? प्रणव मुखर्जी यांनी सादर केलेल्या आजच्या बजेटमध्येही तो झाला. आमच्या बजेटचा केंद्रबिंदूच 'आम आदमी' असल्याने सामाजिक, कृषी या क्षेत्रांच्या विकासासाठी पैसा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे, असे मुखर्जी यांनीही सांगितले.

संयुक्त पुरोगामी आघाडीचा किमान सहमती कार्यक्रम 'सामान्य माणसाला' केंद्रीभूत ठेवूनच तयार करण्यात आला होता. याकडे मुखर्जी यांनी लक्ष वेधले. कृषी क्षेत्रासाठी भरपूर तरतूद केल्याचे जाहीर करताना 'सामान्य माणसा'प्रती आम्ही आमची वचने पाळत आहोत, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

युपीए सरकारने सुरू केलेल्या योजनांसाठी निधी या बजेटमध्ये वाढविण्यात आला आहे. याविषयी सांगताना, या योजना सामांन्यांसाठी असल्याने त्यासाठी तरतूद वाढविण्यात आली आहे, असे ते म्हणाले.