गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2016-2017
Written By
Last Modified: दिल्ली , सोमवार, 29 फेब्रुवारी 2016 (15:13 IST)

इन्कम टॅक्समध्ये दिलासा नाही

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी इन्कम टॅक्समध्ये कोणताही दिलासा न देता, गेल्या वर्षीचेच टॅक्स दर कायम ठेवले आहेत. मात्र 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न असलेल्यांना 3 हजारांपर्यंतची आयकर सूट मिळणार आहे.

करपात्र सेवांवर कृषी कल्याण कर 0.5 % वाढवला आहे. त्यामुळे सर्वच करपात्र सेवा अर्थातच महागल्या. कृषी, ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी भरघोस तरतूद, रस्ते, रेल्वे सारख्या पायाभूत सुविधांना प्राधान्य, श्रीमंतांवर वाढीव कर, आणि चैनीच्या वस्तूंवर अधिक भार. यंदाही टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. मात्र, छोट्या करदात्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 5 लाखापर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना करामध्ये 3 हजारापर्यंत सूट देण्यात आली आहे. त्यामुळे लहान करदात्यांना खूश करण्याचा मोदी सरकारनं प्रयत्न केला आहे.
लहान करदात्यांना जरी खूश करण्याचा प्रयत्न केला असला तरी श्रीमंतांना करकपात अजिबात करण्यात आलेली नाही. 1 कोटी उत्पन्न असणाऱ्यांना 12 ते 15 टक्के सरचार्ज आकारण्यात आला आहे. दुसरीकडे घरभाडे कर सवलतीची मर्यादा 24 हजारावरुन 60 हजारावर करण्यात आली आहे. तर घरासाठी कर्ज घेण्याऱ्या कर्जदारांनाही काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. 50 लाखांपर्यंत घरासाठी 35 लाख कर्ज घेतल्यास त्यामध्ये 50 हजार व्याज वजावट करण्यात येणार आहे.