शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2016-2017
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 मार्च 2016 (17:10 IST)

राज्याचा अर्थसंकल्पाचे ठळक मुद्दे

sudhir munguttivar
- बांबूपासून बनवलेले फर्निचर करमुक्त.
- एलईडी बल्ब, ट्युबवरील करातही कपात, एलईडी बल्बप्रमाणेच ट्यूबवरील कर १२ टक्क्यांवरून ५.५ टक्के
- कर वाढल्याने दुचाकी वाहने, तीन चाकी वाहने, मार्बल, ग्रॅनाईट, चहा महागणार.
- स्तन कर्करोगासाठी वापरण्यात येणाऱ्या मॅमोग्राफी यंत्रावरील कर माफ.
- बॅटरीवर चालणाऱ्या बसेसना करात सवलत.
- वापरलेल्या वाहनांच्या विक्रीवरील कर १२.५ टक्क्यांवर ५ टक्के.
- सीआरपीएफ, एसआरपीएफ कर्मचाऱ्यांच्या करात सवलत, ‏वाहनांच्या इंजिन क्षमतेनुसार वाहनांवर कर आकारणार.
- चहावरील कर पाच टक्क्यांवरुन ५.५ टक्क्यांवर, अर्धा लिटर खोबरेल तेलावर १२.५० टक्के कर.
- लॉटरी योजनेसाठीचा कर सव्वा लाखावरुन दीड लाख करणार.
- पेट्रोल, डिझेल, हिरे, दारुवरील करवाढ आणखी एक वर्ष कायम रहाणार.
- व्हॅटमध्ये ०.५ टक्के करवाढीचा सरकारचा निर्णय.
- राज्याबाहेरून येणाऱ्या मार्बल आणि ग्रेनाईटवर राज्यात प्रवेश कर लागणार.
- अधिस्विकृती पत्रकारांच्या आरोग्यदायी योजनेसाठी १० कोटींची तरतूद.
- राज्याबाहेरील शिवरायांच्या स्मारकांसाठी ५ कोटीची तरतूद
- दुष्काळामुळे नऊ हजार २८९ कोटी रुपयांची महसुली तूट.
- सांगलीत आर.आर पाटील यांच्या स्मरणार्थ भव्य सभागृह उभारणार, त्यासाठी ५ कोटींची तरतूद
- सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मदतीनं लोकमान्य टिळकांचं काम लोकांपर्यंत पोहचवणार.
- टी २० विश्वचषक - न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियालाला गोलंदाजीसाठी आमंत्रीत केले
- महाराष्ट्राबाहेर उभारण्यात येणा-या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद.
- दिल्ली विद्यापीठाबाहेर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि ऑल इंडिया स्टुडंट असोसिएशन ऑफ इंडियाचे कार्यकर्ते भिडले.
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मशताब्दीसाठी १७० कोटींची तरतूद, अल्‍पसंख्याक समाजाच्या विकासाठी ४०५ कोटींची तरतूद.
- मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहांसाठी 220 कोटी, 170 कोटींची योजना आंबेडकरांच्या 125 व्या जयंतीसाठी
- आदिवासी युवकांसाठी पालघरमधे एकलव्य क्रीडा अकादमी, त्यासाठी 25 कोटींची तरतूद.
-अल्‍पसंख्याक समाजाच्या विकासाठी 405 कोटींची तरतूद, 2019 पर्यंत अनुसूचित जातीचं एकही कुटूंब बेघर राहणार नाही
- शक्तिमान घोड्यावर हल्ला केल्याप्रकरणी भाजपा आमदार गणेश जोशी यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
- वारली कलेच्या संवर्धनासाठी वारली हबसाठी ६० कोटींची तरतूद
- १० हजार अंगणवाड्या आदर्श करणार, त्यासाठी १०० कोटींची तरतूद.
- मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमासाठी २,५०० कोटींची तरतूद
- बिहारच्या आमदारांना अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान भेटवस्तू देण्यात आल्या.
- ऐका माझ्या भगिनींनो नाही तुम्ही निराधार, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे सरकार -मनगुटीवार
- माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी २५ कोटींची तरतूद.
- राज्यातील महत्त्वांच्या शहरांमध्ये सीसीटीव्ही प्रकल्पांसाठी ३०० कोटींची तरतूद.
- चंद्रभागेच्या स्वच्छतेसाठी नमानी चंद्रभागा योजना, त्यासाठी 20 कोटींची तरतूद- मुनगंटीवार
- सहा व्याघ्र प्रकल्पांजवळील गावांच्या पुनर्वसनासाठी २०० कोटींची तरतूद.
- न्यायालयांसाठीच्या जागेसाठी आणि न्यायाधीशांच्या निवासस्थानांसाठी ४५० कोटींची तरतूद.
- कृषी दिनाला 2 कोटी वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे
- निसर्ग आणि वनपर्यटनासाठी ३६ कोटींची तरतूद.
- ग्रामीण आरोग्यासाठी २३० कोटी रुपयांची तरतूद
- पोलिसांच्या घरांसाठी ३२० कोटींची तरतूद.
- सार्वजनिक ग्रथालयांचा ई-ग्रंथालयात रुपांतर करणार, त्यासाठी प्रत्येकी 17 लाख रुपयांची तरतूद
- नागपूर मेट्रोसाठी १८० कोटींची तरतुद.
- राज्य अर्थसंकल्प २०१६ - मुंबई, नागपूर, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या शहरात केवळ महिलासांठी 300 बसेस, त्यासाठी 50 कोटींची तरतूद
- चंद्रपूर शहराच्या विकासासाठी म्हाडाची स्थापना, मेट्रो-३ साठी 90 कोटींची तरतूद.
- अकोला, कराड, चंद्रपूर, शिर्डी विमानतळांचा विकास करणार, 2022 पर्यंत सर्वांना घरे, त्यासाठी 700 कोटींची तरतूद.