शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. बजेट 2017-2018
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 30 जानेवारी 2017 (16:44 IST)

विमान सेवा, हॉटेल, मोबाइल फोनचे बिल महागण्याची शक्यता

अर्थमंत्री अरुण जेटली हे 1 फेब्रुवारी राजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात सेवा कर वाढवून 16 ते 18 टक्के केला जाईल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. सध्या सेवाकर 15 टक्के आहे. तो वाढवला जाणार आहे. 
 
वस्तू आणि सेवा कर विधेयक (जीएसटी) लागू होण्यासाठी अद्याप वेळ आहे. त्या पार्श्वभूमीवर या कायद्याची पूर्वतयारी म्हणून सेवा करात वाढ केली जाईल असे अंदाज तज्ज्ञांनी लावला आहे. जीएसटी हा 18 टक्के आहे. त्यामुळे जीएसटीच्या जवळ कर नेला जाऊ शकतो. 
 
सेवाकरात वाढ झाल्यास विमानाने प्रवास करणे, बाहेर फिरणे, हॉटेलात खाणे, फोन बिल आणि इतर सेवा महागणार आहेत.