testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

फॅशनविश्वातील करियरच्या वाढत्या संधी

fashion
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं तर अथक मेहनतीबरोबरच योग्य प्रशिक्षणची जोड असायला हवी. फॅशन विश्वात करियरच्या वाटा धुंडाळताना तर त्याला योग्य नावाची जोडही असायला हवी. या क्षेत्रातील यश अजमावण्यासाठी नेमकं कोणत्या स्वरुपाचं कौशल्य असायला हवं व यासाठी कोणतं प्रशिक्षण घ्यायला हवं याबाबत मार्गदर्शन करताहेत श्री.नितीन मगर, संस्थापक, इंडियन फँशन अकँडमी.
मे महिना आला की सगळ्यांचे शॉपिंग सुरु होते. खरंतर शॉपिंगसाठी कोणतेही निमित्त लागत नाही, पण लग्न, साखरपुडा, पार्टी म्हटले की मात्र आवर्जून शॉपिंग केले जाते. आपल्या सेलिब्रेशनच्या प्रसंगी आपण सगळ्यात जास्त महत्त्व देतो ते पेहरावाला. आपला पेहराव हटके असावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. दर दिवसाला बदलणाऱ्या फॅशनचे ट्रेंड बघता सध्या या क्षेत्रात प्रचंड उलाढाल होत असल्याचेही लक्षात येते. आपल्या व्यक्तिमत्वाला नखशिखांत बदलणाऱ्या या फॅशन इंडस्ट्रीची चलती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
आत्तापर्यंत केवळ नावानेच माहीत असणाऱ्या ब्रॅँड्सने आता ऑनलाइनच्या माध्यमातूनही आपल्या वॉर्डरोबमध्ये जागा पटकावली आहे. अगदी नवनव्या डिझायर्नसनाही स्टार्टअपद्वारे ऑनलाइन प्लॅटफॉर्म माध्यमातून उत्पन्नाची साधने उपलब्ध झाली आहेत. आज सेलिब्रेटींसह, उद्योजक ते नववधू-वरांनाही फॅशन डिझानर्सची गरज भासते. केवळ लग्न वा तत्सम कार्यक्रमांसाठीच ड्रेस डिझाइन करून घेण्याचे दिवस गेले असून या क्षेत्राची व्याप्ती आता बरीच वाढली आहे. त्यामुळेच या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना करियरच्या अनेक संधी आहेत.
फॅशनविश्व हे आता आपल्या जगण्याचा भागच झाले असून यामुळे या उद्योगात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. हे क्षेत्र केवळ कपडयांचे डिझाइनइतक्यापुरतेच मर्यादित नाही, तर नवीन कोणतीही कलाकृती ही फॅशन म्हणून समोर येत आहे, यावरून फॅशन उद्योगाचा आवाका लक्षात येईल. सध्या या क्षेत्रात करियर करण्यासाठी दिवसेंदिवस मुलांच्या संख्येत वाढ होतेय, पण फॅशन म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहितीच नसते. स्वत:ची कल्पकता व कौशल्य वापरून लोकांची आवडनिवड आणि जीवनपद्धती यांची सांगड घालत त्याला अनुसरून नाविन्यपूर्ण डिझाइन्स बनवणे म्हणजे फॅशन. म्हणूनच आपल्यात असलेली नाविन्यता, कौशल्य, आपली कला मांडण्यासाठीचा आत्मविश्वास हे गुण फॅशन डिझायनर होण्यासाठी आवश्यक आहेत. याचबरोबर कुशाग्रबुद्धी, व्यवस्थापकीय गुण, मार्केटिंग कौशल्य आणि महत्त्वाचे म्हणजे संवादकौशल्य या गोष्टीतुमच्याजवळ असल्यास तुम्ही निश्चितच या उद्योगात स्वतःला सिद्ध करू शकता.
दहावी-बारावी झाली की, करिअरचे काही निवडक पर्याय डोळ्यासमोर येतात त्यातील एक म्हणजे फॅशन डिझायनिंगमधील करिअर. या क्षेत्राकडे उत्तम करिअर म्हणून पाहण्याबद्दल अनेकांचे दुमत आहे, पण त्याचबरोबर अनेक गैरसमजही आहेत. हे क्षेत्र केवळ मुलींसाठी आहे असा महत्त्वाचा गैरसमज आहे. आजच्या आघाडीच्या फॅशन डिझायनर्सची नुसती नावं जरी आठवली तरी या समजात तथ्य नसल्याचं लक्षात येते. तसेच केवळ ज्या मुलांना अभ्यासात गती नाही, अशांसाठीच हे क्षेत्र आहे, असंही समजलं जातं. मात्र तुमच्याकडेयोग्य कौशल्य आणि आत्मविश्वास असल्यास तुमची या क्षेत्रातील प्रगती कोणीच रोखू शकत नाही. यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन करणारी संस्था म्हणजे इंडियन फॅशन अॅकेडमी. आपले डिझाईन कसे मांडावे, ते कोणत्या भाषेत मांडावे इथपासून ते या क्षेत्रात स्वत:चा उद्योग सुरु करण्यासाठी काय करावे लागते याबाबत या संस्थेकडून संपूर्णत: मार्गदर्शन केलं जातं. विशेषत: मराठी मुलांना या क्षेत्रातील व्यावसायिक संधींबाबतचं माहिती नसते, त्याबाबतही या संस्थेकडून विशेष साहाय्य केले जाते. तुमच्यातील अंगभूत कौशल्य जाणून घेणं,त्याला योग्य प्रशिक्षण देऊन अधिक पारंगत बनवणं, डिझाइन्सच्या सादरीकरणाबाबत आत्मविश्वास निर्माण करणं, अशा सर्वंकष पद्धतीने इथे उमेदवाराला प्रशिक्षण दिल जातं. या क्षेत्रात येण्यासाठी स्वत:मध्ये वेगवेगळ्या स्तरावर बदल केले पाहिजेत, पण याचबरोबर काही बेसिक गोष्टीही जाणून घेतल्या पाहिजेत.


यावर अधिक वाचा :

फेसबूक पेजवर मुख्यमंत्री योगी सर्वाधिक चर्चेत

national news
फेसबूकवर सर्वाधिक चर्चा झालेल्या नेत्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे. उत्तर प्रदेशचे ...

फेसबुकवर फोन रिचार्ज करता येणार

national news
आता फेसबुकच्या नव्या फिचर मदतीने तुम्ही फोन रिचार्ज करता येणार आहे. हे फिचर केवळ ...

संकटकाळी पक्षाला पाठ दाखवणाऱ्या गद्दारांना आता पक्षात थारा ...

national news
संकटकाळीशरद पवार साहेबांना सोडून गेलेले आज कुठे आहेत ते माहित नाही मात्र पन्नास ...

स्पायडरमॅन ने केले मुलांचे शोषण १०५ वर्ष शिक्षा

national news
अमेरिकामध्ये मोठा निर्णय झाला असून 36 वर्षीय व्यक्तीला कोर्टाने 105 वर्षाची शिक्षा ...

चिमुरडीसोबत बलात्कार करणाऱ्या आरोपींना फाशी

national news
अल्पवयीन चिमुरड्यांवर वाढणाऱ्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी केंद्र सरकारने ठोस पाऊल ...