गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. करिअर मार्गदर्शन
Written By वेबदुनिया|

नर्सिंग क्षेत्रात घडवा करिअर

WD
जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत व्यक्तीच्या आरोग्याची देखभाल/संवर्धन करू शकणारी व्यक्ती म्हणजे परिचारिका होय. या व्यवसायाचे मोल जाणून आज 'नर्सिंग' या करिअरला महत्त्व स्थान प्राप्त झाले आहे. प्रभावी शुश्रुषा करण्यासाठी आज प्रशिक्षित नर्सेसची मोठी आवश्यकता भासते. नर्सिंग हा आरोग्य सेवेचा कणा आहे. नर्सिंग ही ऐक वैद्यकशास्त्र तसेच रुग्णसेवेची एक आघाडीची शाखा आहे. डॉक्टर व रुग्ण यामधील दुवा म्हणजे नर्स होय.

कामाचे स्वरूप
डॉक्टरांनी दिलेले औषध/प्रिस्क्रिशन प्रमाणे देणे. रुग्णाला संपूर्ण माहिती देणे. त्यांच्यानातेवाईकांना रोग/आजराबद्दल माहिती देणे. त्यांची सेवासुश्रुषा करणे. त्यांचे मनोबल वाढवणे. व्यायाम, आहार, घ्यावयाची काळजी व औषधोपचार याविषयी संपूर्ण माहिती एक परिचारिकाच योग्य प्रकारे देत असते.

सामाजिक आरोग्य सेवा पुरवणे.
माता-बाल सेवा पुरविणे ही तर एक मुख्य कणाच आहे.
नर्सिंगसंबंधीचे प्रशासन तसेच व्यवस्थापन विषयक कामे.
रुग्ण व नातेवाईकांना आरोग्यसल्ला देणे.
अलीकडे समुपदेशनाचे कार्यही परिचारिका करीत आहे.

परिचारिक
गरजवंताचे संगोपन करणे, संवर्धन करणे, पोषण करणे तसेच त्यांना शिक्षण देण्याचे कार्य जी व्यक्ती करते, तिला 'परिचारिका' असे म्हणतात.

नर्सिंगमधील विविध अभ्यासक्रम
डॉक्टरेट पीएच.डी (नर्सिंग), रिसर्च, एम.फिल. (नर्सिंग), पदव्युत्तर- एम.एससी. (नर्सिंक), पदवी (पोस्ट बेसिक), पी.बी. बी. एससी (नर्सिंग), (बेसिक) बी.एससी (नर्सिंग)

पदविका (पोस्ट बेसिक)
1. डिप्लोमा इन नर्सिंग एज्यकेशन अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन
2. क्रिटिकल केअर नर्सिंग
3. ऑन्कोलॉजी (कॅन्सर) नर्सिंग
4. कार्डिओ थोरॉसिक नर्सिंग
5. सायकॅट्रिक नर्सिंग
6. न्यूरो नर्सिंग
7. न्यूओनेटल नर्सिंग
8. ऑपरेशन रूम इन नर्सिंग
9. ऑर्थोप‍ेडिक अ‍ॅण्ड रिहॅबिलिटेशन नर्सिंग
10. नर्सेस प्रॅक्टिस इन मिडवायफरी
11. सामाजिक आरोग्य परिचर्या (पब्लिक हेल्‍थ नर्सिंग)

पदविका (जनरल)
जनरल नर्सिंग अ‍ॅण्ड मिडवायफर
बेसिक कोर्स
ऑक्सिलरी नर्स अ‍ॅण्ड मिडवायफरी
करिअरच्या संधी
नर्सिंग कोर्स केल्यानंतर विविध ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते.
विदेशात नोकरी
आपल्या देशातील नर्सिंक शिक्षण हे जागतिक पातळीवर मान्यताप्राप्त असल्याने आपल्या देशातील परिचारिकांना विदेशात प्रचंड मागणी आहे.

शासकीय रुग्णालयात संध
प्रत्येक केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या वैद्यकीय महाविद्यालय, विशेष उपचार केंद्र, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र या शासनाच्या विविध रुग्णालयांमध्ये नर्सेसची अनेक पदे आहेत.

स्वतंत्र व्यवसाय/ शुश्रुषा सेव
नर्सिंग कौन्सिलशी नोंदणीकृत झालेले नर्सेस स्वत:ची नर्सिंग ब्यूरो स्थापन करू शकतात व गरजू रुग्णांना स्वतंत्र नर्सिंग केअर देऊ शकतात.

शिक्षण क्षेत्
विविध शासकीय महानगरपालिका खासगी किंवा अभिमत महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम करता येते. शिवाय सर्व अपंग मतिमंद मुलांसाठीच्या शाळांमध्ये नर्स परिचारिकांचे किमान एक पद असते. अनेक उद्योगक्षेत्रे आणि कंपन्यांमध्येदेखील नर्सेसचे पद नियुक्त केलेले असते. तसेच संशोधनाच्या विविध प्रकल्पांमध्ये काम करण्याची नर्सेसला संधी उपलब्ध आहे.