गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. करिअर
  4. »
  5. करिअर मार्गदर्शन
Written By वेबदुनिया|

पॅथॉलॉजिस्ट : करिअरबरोबर मिशन

WD
पॅ‍थॉलिजिस्ट मेडिकल सायंसची एक शाखा आहे. या अंतर्गत आजाराची कारणे, विकास आणि प्रभावांचा अभ्यास केला जातो. पॅथॉलॉजिस्टच्या आणखी दोन मुख्य शाखा आहेत. क्लिनिकल पॅथॉलॉजी आणि एनाटॉमिकल पॅथॉलॉजी. रोग्याचे शरीर, रक्त धमन्या आणि शरीरातील तरल पदार्थाचे निरीक्षण करून त्यावर उपचार विधी शोधून काढण्याचे काम पॅथॉलॉजिस्ट करतात. एक पॅथॉलॉजिस्ट फिजिशियन आणि सायंटिस्ट अशी दोन भूमिका पार पाडत असतो.

पर्सनल स्किल्स
डिटेक्टीव्ह आणि सायंटिफिक‍ थिंकींग, ह्यूमन अ‍ॅनॉटॉमी आणि फिजिओलॉजीचे उत्तम ज्ञान तसेच मायक्रोस्कोपच्यामागे काम करण्याची जिज्ञासा.

क्वॉलिफिकेशन
देशातील बरेच मेडिकल कॉलेज आणि विश्वविद्यालयांमध्ये पॅथॉलॉजीचा कोर्स आहे. जर तुम्ही फिजिक्स, केमेस्ट्री, बायॉलॉजीमधून बारावी उत्तीर्ण असाल तर एमबीबीएस करण्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. एबबीबीएस कोर्स केल्यानंतर पॉथॉलॉजिस्ट बनण्यासाठी तुम्हाला पॅथॉलॉजी, बायोकेमेस्ट्री, क्लिनिकल बायोकेमेस्ट्री, किंवा मायक्रोबायोलॉजीमध्ये एमडी किंवा बायोकेमेस्ट्रीमध्ये डीएनबी करावे लागेल.

कोणकोणते कोर्स आहेत?
यासाठी M.D. Pathology, M.sc.Med.Tech. (Pathology), Ph-D ( Pathology), Ph-D (Speeh pathology), Diploma in Clinical Pathology (DCP), M.D. Certificate cytopathology.

आधी सेल्फ असेसमेंट करनू घ्या की तुमच्यामध्ये पॅथॉलॉजिस्ट बनण्याची स्कील आहे की नाही. जर नसेल तर पॅथॉलॉजिस्ट बनण्याचा विचार सोडून द्या. कारण हा असा चॅलेंजिंग जॉब आहे ज्यात तुमत्या थोड्याशा चुकीमुळे कोणाचा जिवसुद्धा जावू शकतो. तसे बघितले तर हा बराच मोठा पॅकेज देणार प्रोफेशन आहे. यात फ्रेशरलासुद्धा बराचमोठा प्रोफेशनलच्या तुलनेच बराच रिकामा वेळ मिळू शकतो. चुकीच्या डायग्नोजमुळे तुम्ही अडचणीतसुद्धा येवू शकता.