शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By

फॅशनविश्वातील करियरच्या वाढत्या संधी

कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं तर अथक मेहनतीबरोबरच योग्य प्रशिक्षणची जोड असायला हवी. फॅशन विश्वात करियरच्या वाटा धुंडाळताना तर त्याला योग्य नावाची जोडही असायला हवी. या क्षेत्रातील यश अजमावण्यासाठी नेमकं कोणत्या स्वरुपाचं कौशल्य असायला हवं व यासाठी कोणतं प्रशिक्षण घ्यायला हवं याबाबत मार्गदर्शन करताहेत श्री.नितीन मगर, संस्थापक, इंडियन फँशन अकँडमी.
 
मे महिना आला की सगळ्यांचे शॉपिंग सुरु होते. खरंतर शॉपिंगसाठी कोणतेही निमित्त लागत नाही, पण लग्न, साखरपुडा, पार्टी म्हटले की मात्र आवर्जून शॉपिंग केले जाते. आपल्या सेलिब्रेशनच्या प्रसंगी आपण सगळ्यात जास्त महत्त्व देतो ते पेहरावाला. आपला पेहराव हटके असावा अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. दर दिवसाला बदलणाऱ्या फॅशनचे ट्रेंड बघता सध्या या क्षेत्रात प्रचंड उलाढाल होत असल्याचेही लक्षात येते. आपल्या व्यक्तिमत्वाला नखशिखांत बदलणाऱ्या या फॅशन इंडस्ट्रीची चलती दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
 
आत्तापर्यंत केवळ नावानेच माहीत असणाऱ्या ब्रॅँड्सने आता ऑनलाइनच्या माध्यमातूनही आपल्या वॉर्डरोबमध्ये जागा पटकावली आहे. अगदी नवनव्या डिझायर्नसनाही स्टार्टअपद्वारे ऑनलाइन प्लॅटफॉर्म माध्यमातून उत्पन्नाची साधने उपलब्ध झाली आहेत. आज सेलिब्रेटींसह, उद्योजक ते नववधू-वरांनाही फॅशन डिझानर्सची गरज भासते. केवळ लग्न वा तत्सम कार्यक्रमांसाठीच ड्रेस डिझाइन करून घेण्याचे दिवस गेले असून या क्षेत्राची व्याप्ती आता बरीच वाढली आहे. त्यामुळेच या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्यांना करियरच्या अनेक संधी आहेत.
फॅशनविश्व हे आता आपल्या जगण्याचा भागच झाले असून यामुळे या उद्योगात अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. हे क्षेत्र केवळ कपडयांचे डिझाइनइतक्यापुरतेच मर्यादित नाही, तर नवीन कोणतीही कलाकृती ही फॅशन म्हणून समोर येत आहे, यावरून फॅशन उद्योगाचा आवाका लक्षात येईल. सध्या या क्षेत्रात करियर करण्यासाठी दिवसेंदिवस मुलांच्या संख्येत वाढ होतेय, पण फॅशन म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहितीच नसते. स्वत:ची कल्पकता व कौशल्य वापरून लोकांची आवडनिवड आणि जीवनपद्धती यांची सांगड घालत त्याला अनुसरून नाविन्यपूर्ण डिझाइन्स बनवणे म्हणजे फॅशन. म्हणूनच आपल्यात असलेली नाविन्यता, कौशल्य, आपली कला मांडण्यासाठीचा आत्मविश्वास हे गुण फॅशन डिझायनर होण्यासाठी आवश्यक आहेत. याचबरोबर कुशाग्रबुद्धी, व्यवस्थापकीय गुण, मार्केटिंग कौशल्य आणि महत्त्वाचे म्हणजे संवादकौशल्य या गोष्टीतुमच्याजवळ असल्यास तुम्ही निश्चितच या उद्योगात स्वतःला सिद्ध करू शकता.
 
दहावी-बारावी झाली की, करिअरचे काही निवडक पर्याय डोळ्यासमोर येतात त्यातील एक म्हणजे फॅशन डिझायनिंगमधील करिअर. या क्षेत्राकडे उत्तम करिअर म्हणून पाहण्याबद्दल अनेकांचे दुमत आहे, पण त्याचबरोबर अनेक गैरसमजही आहेत. हे क्षेत्र केवळ मुलींसाठी आहे असा महत्त्वाचा गैरसमज आहे. आजच्या आघाडीच्या फॅशन डिझायनर्सची नुसती नावं जरी आठवली तरी या समजात तथ्य नसल्याचं लक्षात येते. तसेच केवळ ज्या मुलांना अभ्यासात गती नाही, अशांसाठीच हे क्षेत्र आहे, असंही समजलं जातं. मात्र तुमच्याकडेयोग्य कौशल्य आणि आत्मविश्वास असल्यास तुमची या क्षेत्रातील प्रगती कोणीच रोखू शकत नाही. यासाठी सर्वतोपरी मार्गदर्शन करणारी संस्था म्हणजे इंडियन फॅशन अॅकेडमी. आपले डिझाईन कसे मांडावे, ते कोणत्या भाषेत मांडावे इथपासून ते या क्षेत्रात स्वत:चा उद्योग सुरु करण्यासाठी काय करावे लागते याबाबत या संस्थेकडून संपूर्णत: मार्गदर्शन केलं जातं. विशेषत: मराठी मुलांना या क्षेत्रातील व्यावसायिक संधींबाबतचं माहिती नसते,  त्याबाबतही या संस्थेकडून विशेष साहाय्य केले जाते. तुमच्यातील अंगभूत कौशल्य जाणून घेणं,त्याला योग्य प्रशिक्षण देऊन अधिक पारंगत बनवणं, डिझाइन्सच्या सादरीकरणाबाबत आत्मविश्वास निर्माण करणं, अशा सर्वंकष पद्धतीने इथे उमेदवाराला प्रशिक्षण दिल जातं. या क्षेत्रात येण्यासाठी स्वत:मध्ये वेगवेगळ्या स्तरावर बदल केले पाहिजेत, पण याचबरोबर काही बेसिक गोष्टीही जाणून घेतल्या पाहिजेत. 
निसर्गच आपला गुरु - आपली संस्कृती, हवामान, शरीरयष्टी याप्रमाणेच फॅशनचे रंगढंगही वेगळे असतात. म्हणूनच तुमचं कौशल्य जपत किती गोष्टी स्विकारायच्या ते आपणच ठरवलं पाहिजे. फक्त इतरांचं अनुकरण न करता आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचं निराक्षण करत आपल्या कौशल्यात सतत प्रयोग केले पाहिजेत. निसर्ग आपल्याला खूप काही देतो, फक्त ते जाणून घेता यायला हवं. निसर्गातीलविविध डिझाईन (फुलं,पानं, वेल, बुट्टी, पक्षी) व रंग नेहमीच आपल्या डोळ्ययासमोर असतात. त्याचा वापर आपण मुक्त हस्ताने करावा.
 
प्रेरणा – आपण व इतर लोक यांच्या विचार करण्याच्या पद्धतीत फरक असतो. त्यामुळे आपल्या डिझाइन्स प्रत्येकाला आवडतीलच असे नाही. म्हणूनच या डिझाइन्सवर कोणी ताशेरे मारले वा कोणाला त्या आवडल्या नाहीत तरी उदास न होता आपल्या कामावर पूर्णत: लक्ष केंद्रीत करायला हवं. आपल्या कामात नाविन्यता जपत अधिकाधिक डिझाइन्सवर बनवण्यावर भर द्यावा.
 
जुनं ते सोनं –  आपल्याकडे अनेक वर्षांपासून हातमागावर विविध प्रकारची वस्त्रे विणली जातात. याबरोबरच अनेक पारंपारिक कला अजूनही अस्तित्वात आहेत. त्यांचा अभ्यास करुन, त्याद्वारे वैविध्यपूर्ण डिझाईन तयार करुन स्वत:चा एक वेगळा ब्रॅण्ड बनवता येऊ शकतो आणि या क्षेत्रात स्वत:चा ठसाही उमटवता येतो.
 
योग्य प्रशिक्षण - फॅशन डिझाइनिंगचं योग्य ज्ञान घेण्यासाठी चांगल्या नावाजलेल्या संस्थेमधून डिप्लोमा वा पदवी पर्यंत शिक्षण घ्या.अभ्यासक्रमापेक्षा स्वत:च्या कौशल्यावर भर द्या. या क्षेत्राला आवश्यक असे बदल स्वत:मध्ये करा. याबरोबरच या क्षेत्रात काक कसं चालतं, डिझायनर्स कसे काम करतात हे प्रत्यक्ष पहा आणि शिका. त्यासाठी प्रॅक्टिकल ज्ञान मिळवा. हे सगळं करताना स्वत:ला तांत्रिकदृष्ट्याही तितकंच कुशल बनवा. केवळ  ग्रेडसाठी वा सर्टिफिकीटसाठी हे प्रशिक्षण घेऊ नका.
 
इंटर्नशिप - इंटर्नशिपमध्ये ब्रॅण्डसाठी काम करताना ज्या डिझाइनची कल्पना करत आहात, ते कागदावरून हँगरवर कसं आणायचं हे प्रत्यक्ष अनुभवायला मिळतं. हे करताना तुम्ही कोणत्या डिझायनरकडे वा ब्रॅण्डसाठी काम करत आहात, ते पाहणंही गरजेचं असतं. तसेच तुमची आवड आणि तुमचं काम यांची संगती लागणंही आवश्सक असतं. हे सगळं जुळून आलं तरच तुम्ही योग्य प्रकारे काम करू शकता.
 
वेळ –  कोणत्याही कामात दिलेली वेळ खूप महत्त्वाची असते. म्हणूनच योग्य नियोजन करून, दिलेल्या वेळेत डिझाईन पूर्ण करुन ड्रेस तयार करायला घ्यावा. हे वेळेचं गणित पाळल्यास पुढे आपल्याला त्याची सवय लागते व आपण वेळेत सर्व डिझाईन पूर्ण करु शकतो. अन्यथा समोरच्या क्लायंटकडून तुमचे डिझाइन नाकारले जाऊन तुमचे कष्ट, कापड, पैसा सगळंच वाया जाण्याची शक्यता असते.
 
शोध नाविन्याचा –  नाविन्यता जपणं ह तर या क्षेत्राचा स्थायीभाव. म्हणूनच नेहमी विविध डिझाईन व रंगाचा शोध घेत रहा. काहीतरी वेगळं करण्यासाठी सर्व दिशांमधून याचा अभ्यास करायला हवा. यासाठी वैविध्यपूर्ण वाचन करून इतर संस्कृती व देशांमध्ये सध्या चालू असणाऱ्या फॅशन ट्रेंण्डचा मागोवा घ्यावा व या क्षेत्राचा सतत सखोल अभ्यास करत रहा.
 
आत्मविश्वास - आपल्याला कोणत्या प्रकारचं काम करायचं आहे आणि ते कशासाठी आहे, हे आधी ठरवा. त्यातूनच आपल्यात आत्मविश्वास येईल. एकदा हे ठरवलं की, तुम्हाला कशाचीही भीती वा संकोच बाळगण्याचं कारण उरत नाही. स्वत:च्या कामावर विश्वास ठेवूनच या क्षेत्रातील कसोटीला उतरायला हवं.
 
इंडियन फॅशन अॅकेडमी ही संस्था गेल्या अनेक वर्षापासून या क्षेत्रात विद्यार्थ्यांना यशस्वीपणे आपल्या पायावर उभे राहण्यास मार्गदर्शन करत आहे. आजपर्यत अनेक नामांकीत व्यक्तींना घडविण्यात या इन्स्टिट्यूटचा मोलाचा वाटा आहे. कोणत्याही क्षेत्रात उंच भरारी घ्यायची असेल तर त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती व योग्य मार्गदर्शन असणे आवश्यक असते. दहावी-बारावी उत्तीर्ण अथवा नापास विद्यार्थी, गृहिणी व नोकरी करूनही फॅशनमधील आपली आवड जोपासण्याची महत्त्वाकांक्षा असणाऱ्यांना या अॅकेडमीद्वारे संधी देण्यात येते. या संस्थेची शिकविण्याची पद्धत, आंतरराष्ट्रीय स्तरावरील ज्ञान असलेले शिक्षक यामुळे याचा विद्यार्थ्यांना खूप लाभ होतो. याचबरोबर संस्थेद्वारे फॅशन विश्वातील दिग्गजांचे काम पाहण्याची व त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळण्याची संधीही दिली जाते. जी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीतही उपयुक्त ठरते. या क्षेत्रात करियर करू इच्छिणारे स्वत:चे स्टुडीओ सुरु करू शकतात किंवा त्यांना अनेक नावाजलेल्या फॅब्रिक कंपनीमध्ये नोकरीची संधी मिळू शकते. याबरोबरच सिनेसृष्ट्रीत वैयक्तिक डिझाईनर म्हणून काम करता येते. यासाठी फॅशन डिझाइनिंगमधील डिप्लोमा वा डिग्री किंवा डिप्लोमा इन फॅशन अॅण्ड टेक्सटाईल डिझाईनिंग अशा स्वरुपाचे अभ्यासक्रम करणे आवश्यक आहे. 
 
कोणताही व्यवसाय वा क्षेत्र हे नाविन्यता जपलं तरच पुढे जातं. फॅशनमध्ये तर दिवसागणिक बदल होताना दिसतो. म्हणूनच स्वत:ची ओळख तयार करायची असेल तर अशा क्षेत्रात येण्यासाठी योग्य संस्थेतील प्रशिक्षण अवश्य घ्या.