गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: मंगळवार, 30 जून 2015 (12:07 IST)

मॅनेजमेंट कन्सलटन्सीमध्ये करिअर

गेल्या एका दशकात मॅनेजमेंट शिक्षणाबरोबर त्याच्या अभ्यासक्षेत्रातही मोठ्याप्रमाणात बदल झाले आहेत. कौटुंबिक व्यवसाय ही आता व्यावसायिक झाले आहे. खासगी कंपनीतील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे पगार ही आता दोन कोटींवरून 20 कोटींपर्यंत पोहचले आहेत. तरुण व्यावसायिक आता वयाच्या चाळिशीत फक्त सीईओच होत नसून कंपनीच्या बोर्डाचे सदस्यही होत आहेत.
 
माहिती तंत्रज्ञानाबरोबर आर्थिक सेवा आणि मॅनेजमेंट क्नसलटन्सीमध्येही नोकरीच्या शक्यता मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. आता कंपन्या वरिष्ठ अधिकार्‍यांना कामावर फक्त घेत नाहीत तर त्यांना जास्तीत जास्त काळ आपल्याकडेच ठेवण्याचा प्रयत्नही करत आहेत. पूर्वी कंपन्या मॅनेजमेंट ट्रेनीजवर जास्त विश्वास ठेवायच्या. बदलत्या परिस्थितीमध्ये कंपन्यांच्या बोर्डासमोर चुकीच्या मॅनेजमेंट प्रॅक्टिस समोर आल्या आणि कंपन्यांना यामुळे मोठे नुकसान झाले. कंपन्यांमध्ये डेलिगेशन्स वाढले आहे. तरीसुद्धा खासगी संस्था आणि फॅमिली मॅनेज्ड कंपन्यांमध्ये अजूनही मोठ्याप्रमाणात व्यवस्थापनाचे केंद्रीकरणच आहे. कंपन्यांना आता चांगल्या कामगिरीसाठी खासगीबरोबर पब्लिक सेक्टरमधील कंपन्याही व्यावसायिक कन्सलटन्सीचा मोठ्या प्रमाणात उपयोग करत आहे.
 
व्यवस्थापनाचे शिक्षण देणार्‍या संस्थांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ झाली आहे. बिझनेस शाळांबरोबर एमबीए कोर्सच्या संख्येतही वाढ दिसून येते. व्यवस्थापनाच्या दोन वर्षाच्या कोर्सबरोबर आता वर्किंग एक्झिक्युटिव्हच एक वर्षाचा एमबीए प्रोग्रॅमही लोकप्रिय झाला आहे. इतकंच नव्हे तर कोर्स कंटेन्टमध्येही बदल झाले आहे. माहिती प्रधान शिक्षणाऐवजी फायनान्स, स्ट्रॅटजिक मॅनेजमेंटला मोठे महत्त्व मिळत आहे. भारतीय विद्यार्थ्यांचे ग्लोबल एक्सपोजर वाढत आहे. हे शिक्षण घेण्यात मुलींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. व्यवस्थापन शिक्षण हे आता डाटा बेस्ड, केस ओरिएंटेड आणि पार्टिसेपेटीव्ह झाले आहे.