गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: पुणे , गुरूवार, 9 जुलै 2015 (15:42 IST)

सुर्यदत्ता ग्रुपने ५० कर्मचा-यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहीर केली

“इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरफेस” सामाजिक बांधिलकी उपक्रमाच्या माध्यमातून उच्च शिक्षणाची संधी
विविध कंपन्यांमधील ५० कर्मचा-यांना उच्च शिक्षणाची संधी मिळणार
सुर्यदत्ता ग्रुपने गेल्या चार वर्षांपासून ४० लाख रुपयांची शिष्यवृत्ती विविध कंपन्यांमधील २०० कामगारांना उपलब्ध करून दिली आहे. 
या अभ्यासक्रमाच्या नोंदणीची शेवटची तारिख २७ -७ -२०१५  ही असेल. विविध कंपन्यांमधील निष्ठावंत कर्मचारी उच्च शिक्षणासाठी नोंदणी करु शकतात.
या उपक्रमाअंतर्गत येणा-या कोर्सेससाठी कर्मचारी पदवीधारक असणे आवश्यक आहे. 
अधिक माहितीसाठी - नुतन- ०२०- २४३३०४२५, ८९५६९३२४१५, ९७६३२६६८२९ 

“इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरफेस”चा सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून ‘सुर्यदत्ता ग्रुपने’ आजपर्यंत ४० लाख रुपयांची शिष्यवृत्ती विविध कंपन्यांमधील २०० कर्मचाऱ्यांना दिली आहे. ‘सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ उच्च स्तरावरील संशोधन, चांगले व्यवस्थापन आणि योग्य नेतृत्व यासाठी प्रसिध्द आहे. तसेच ते सामाजिक जाणीव व कर्तव्य यासाठीही कटिबध्द असतात. त्यामुळेच सुर्यदत्ताने ५० कर्मचाऱ्यांना “इंडस्ट्री इन्स्टिट्यूट इंटरफेस”च्या वतीने उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. 
 
यासाठी सुर्यदत्ताने विविध कंपन्यांना एक विनंती पत्र पाठवले, ज्यात त्यांच्या कंपनीमधील प्रामाणिक व गुणी कर्मचा-यांची निवड करण्यास सांगितले. सुर्यदत्ताने या कर्मचाऱ्यांना मॅनेजमेंट स्टडिजमधील आयटी, परकीय व्यापार फाईनान्स, विपणन अशा विविध शाखांसाठी प्रवेश देण्याचे ठरवले आहे. २२ ते ५० वयोवगटातील या कर्मचा-यांना पीडीबीएम, पीजीडीएमएलएम, पीजीडीएफटी, पीजीडीएमएम, एमपीएम या अभ्यासक्रमासाठी शिक्षण घेता येईल. या कर्मचा-यांमध्ये प्रॉडक्शन मॅनेजर, स्टोअर मॅनेजर, साईन लिडर, सिनिअर अधिकारी , सुप्रिटेंडंट या पदावरील व्यक्तींचा समावेश असेल. 
 
सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय चोरडिया म्हणाले की, ‘बऱ्याच वेळेस पैशांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण पदवीपर्यंतच होते व ते लगेच नोकरीला लागतात. त्यांना पुढील पदव्युत्तर शिक्षण घेता येत नाही. मी स्वतः नोकरी आणि शिक्षण एकाचवेळी घेतले असल्याने मला याची पूर्ण जाणिव आहे. पैशांमुळे कोणत्याही शिक्षणात अडचण येऊ नये, हा आमचा ही शिष्यवृत्ती देण्यामागचा उद्देश आहे. या शिवाय आजकाल कंपन्यांमध्ये फक्त पदवीधारकांना बढती मिळणे कठिण झाले आहे. विविध कंपन्यांमध्ये पदव्युत्तर कर्मचा-यांनाच जास्त मागणी आहे. त्यामुळे या उपक्रमातून आम्ही सर्व कर्मचारी व व्यावसायिक यांना आवाहन करु इच्छितो, की या संधींचा जास्तीत जास्त त्यांनी लाभ घ्यावा.’
 
या अभ्यासक्रमांचा लाभ घेणा-या माजी विद्यार्थ्यांनीही यावेळी आपले अनुभव सांगितले. या उपक्रमात मागील वर्षी सहभागी झालेले बीएजी इलेक्ट्रॉनिकचे मॅनेजर कौशिक शेंड्ये म्हणाले, आमच्या कंपनीतील सात जणांनी   सुर्यदत्तामध्ये विविध अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. कंपनीतील काम, घर आणि हा अभ्यासक्रम अशा जबाबदा-या सांभाळताना आम्हा लोकांचा पूर्ण कस लागायचा. आमच्या या प्रयत्नाला सुर्यदत्ता संस्थेबरोबरच आमच्या कंपनीने आम्हाला सहकार्य केले. कंपनीतील सातही जण एकाच वेळेस परिक्षा देण्यासाठी होतो, त्यावेळेस कंपनीने आमच्या अभ्यासाची खूप काळजी घेतली. या माजी विद्यार्थ्यांमध्ये केदार कुलकर्णी व मनिषा मेमाणे यांनीही आपले अनुभव यावेळी सांगितले.  
 
भारत फोर्ज(१०), कमिन्स (४),मर्स्क प्रा.लि.(१), झेडएफ स्टेअरिंग लि.(१), बीएजी इलेक्ट्रॉनिक(७), ‘टाटा यझाकी(२७), केनिअर्स इंडिया प्रा. लि. (२), फ्लिट गार्ड (३), कॅल्पेक्स कर्मशिअल्स (३), इर्नरिजीया(५), एचडीएफसी(१), नोव्हार्टीस(५), आयडीबीआय बॅंक(१), झेड एफ स्टिअरिंग (आय) ली. (६), हिंदुस्थान कोका कोला (५), सॅंडव्हिक (४), सिप्ला (२), किर्लोस्कर चिलर्स (२), शहाज इन्फोटेक, श्री चौगुले (१ आय) प्रा.ली. आता पर्यंत अशा प्रमुख कंपन्या या उपक्रमात सहभागी झाल्या आहेत. कर्मचा-यांची शैक्षणिक पात्रता वाढविण्यासाठी त्यांना विविध अभ्यासक्रमासाठी पाठविण्यात येणार आहे.’
 
हे सर्व अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाशी संलग्न असून हे अभ्यासक्रम ३०-७-२०१५ पासून चालू होत आहेत. 
 
सुर्यदत्ता ग्रुप इन्स्टिट्यूटची वैशिष्ट्ये 
शहराच्या मध्यभागात स्थित
सर्वांना सुलभ वेळ 
अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर
सर्व विद्यार्थ्यांकडे वैयक्तिक लक्ष व सहकार्य
‘सुर्यदत्ता’ संस्थेच्या या उपक्रमाला विविध कंपन्यांच्या कर्मचा-यांनीही उदंड प्रतिसाद दिला आहे. कंपन्यांमध्ये काम करणा-या कर्मचा-यांसाठी अशा प्रकारचा अनुभव उपक्रम राबविल्याबद्दल ते संस्थेबद्दल आदर व्यक्त करीत आहेत. शिष्यवृत्तीच्या नोंदणीची शेवटची तारिख २५-७-२०१५  ही असेल. 
अधिक माहितीसाठी संपर्क- ०२०- २४३३०४२५, ८९५६९३२४१५, ९७६३२६६८२९