शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By वेबदुनिया|

कैरी-कांदा लोणचं

साहित्य - १ किलो कैरीचे तुकडे १00 ग्रॅम मोहरी डाळ, १0 ग्रॅम मेथी पूड, लाल तिखट पूड, हळद पूड, २00 ग्रॅम मीठ, ८-१0 लवंगा, १0-१२ काळी मिरी, हिंग, मोहरीचं तेल, १/२ टी. स्पू. सायट्रिक अँसिड, १५ ग्रॅम बडीशोप पूड, ५00 ग्रॅम लहान कांदे. 

कृती - सर्वप्रथम कैरीचे पातळ काप करावे. कांदे सोलून कांद्यांना उभ्या आडव्या दोन चिरा द्याव्या. लवंगा, काळीमिरी सोडून एका परातीत सर्व मसाले एकत्र करावे. मोहरीचं तेल धूर निघेपर्यंत गरम करावं. तेलात लवंगा, मिरी टाकून गॅस बंद करावा. परातीत एकत्र केलेल्या मसाल्यावर चमच्यानं थोडं तेल टाकून मसाला चांगला एकत्र करावा. मसाला गार झाला की त्यात कैरीचे काप, कांदे घालून हे सर्व मिश्रण चांगलं एकत्र करावं. बरणीत भरून उरलेलं तेल पूर्णपणे थंड झालं की बरणीतल्या लोणच्यावर ओतावं. दोन दिवसानं लोणचं ढवळावं. आठ दहा दिवसानं लोणचं चांगलं मुरून खाण्यास तयार होतं.