Widgets Magazine
Widgets Magazine

रेसिपी: नारळ कैरीची चविष्ट चटणी

raw mango chautni

सामग्री
* ओले नारळ - 1
* चिरलेली कैरी - 1/2 कप
* हिरवी मिरची - 2
* मीठ - चवीनुसार
* पाणी - आवश्यकतेनुसार
फोडणीसाठी
* तेल- 1 चमचा
* मोहरीची डाळ - 1/2 चमचा
* लाल मिरची - 1
* करी पत्ता- 10
* कैरीचे तुकडे सजावटीसाठी
कृती
नारळाचे वरचे सालपट काढून त्याचे बारीक बारीक तुकडे करावे. मिक्सरच्या भांड्यात नारळ, कैरी, हिरवी मिरची आणि थोडेसे पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यावी. तयार मिश्रणाला एका बाऊलमध्ये काढून घ्या. चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या. आता एका लहान पॅनमध्ये तेल गरम करून त्यात फोडणीचे सर्व साहित्य घालून फोडणी तयार करावी व चटणीवर टाकावी. कैरीचे तुकड्यांनी सजवून सर्व्ह करावे.


यावर अधिक वाचा :