गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By

कैरीचा सॉस

साहित्य: १ मध्यम आकाराची कैरी, चवीनुसार मीठ, मेथीची पूड पाव चमचा, गुळ १ चमचा, बडीशेप पूड १/४ चमचा, फोडणीसाठी १ चमचा तेल, हिंग व मोहरी, तिखट (लाल) १ चमचा.

कृती: प्रथम कैर्‍या कुकरमध्ये वाफवून घ्याव्यात. गार झाल्यावर त्याचा गर मिक्सरमधून काढावा, नंतर त्यात गूळ, मेथीची पूड, बडीशेप पूड, तिखट व मीठ घालावे. तेलाची हिंग मोहरीची फोडणी करून त्यात सर्व मिश्रण घालून एक उकळी आणावी व थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवावे. उन्हाळ्याचा उकाडा कमी करण्यासाठी हे चटपटीत सॉस तोंडाला पाणी सोडणारे व रुचकर आहे.