शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. थोडं आंबट थोडं तिखट
Written By

टॉमेटोचे सार

साहित्य :  ७-८ लाल टॉमेटो, २ हीरव्या मिरच्या, आलं, कोथिम्बिर, कढिपत्ता ५-६ पाने, मीठ, साखर
 
कृती : सर्व प्रथम टॉमेटो शिजवून घ्यावेत. नंतर ते उकडलेले टॉमेटो, १ मिरची, कढीपत्त्याची पाने, थोडीशी कोथिंबिर, इंचभर आलं अस ब्लेंडर ने किंवा मिक्सरमधून फिरवून घ्याव. मग हे मिश्रण चाळणीतून किंवा गाळण्याने गाळून चोथा टाकून द्यावा. मग गाळलेला साराचा भाग मंद गॅसवर चवीपुरता मीठ, साखर, उरलेली कोथिंबिर, हवी असल्यास अजून एखादी मिरची घालून उकळून घ्याव. हे सार जरा गोडसरच चांगल लागते.