शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. अडगुलं मडगुलं
Written By

सोयाबीनयुक्त आहार बाळासाठी धोकादायक

सोयाबीनयुक्त पदार्थ खाल्ल्याने बालकांची प्रतिकारक्षमता, भौतिक परिपक्वता आणि बालकांच्या विकासाची गती मंदावते. त्यामुळे भविष्यात अभ्यासात ही मुले मेगे पडतात. लहान मुलांमध्ये चिडचिडेपणा वाढीस लागते. 

सोयाबीनयुक्त पदार्थाच्या सेवनाचे संभाव्य धोके लक्षात घेऊन त्यात घटक पदार्थाचा नव्याने अभ्यास करावा तसेच त्यावर उपाययोजना आखाव्यात, असे स्पष्ट मत ‘कारा वेस्टममार्क’ यांनी आपल्या निष्कर्षात व्यक्त केले आहे.

सोयाबीनपासून तयार करण्यात येणारे खाद्यपदार्थ आरोग्यासाठी लाभदायक नव्हे तर मोठय़ा प्रमाणात हानिकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. बाळाला दुग्धजन्य पदार्थ देण्याऐवजी सोयाबीनपासून तयार करण्यात येणारा आहार अधिक प्रमाणात देण्यात येतो. त्यामुळे त्यांच्या रक्तात 13 ते 22 हजार पटीने ‘आईसोफ्लेवोन्स’ तयार होत असल्याचा निष्कर्ष अमेरिकेतील विस्कन्सिल-मेडिसिन युनिव्हर्सिटीच्या चमूने काढला आहे. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रासोबतच आहारतज्ज्ञांमध्ये खळबळ उडाली आहे.
 
अमेरिकेतील विस्कन्सिल-मेडिसिन युनिव्हर्सिटीतील कारा वेस्टमार्क यांच्या नेतृत्वाखालील चमूने गाईचे दूध आणि सोयाबीनपासून तयार करण्यात आलेला आहार घेत असलेल्या दोन हजार बाळांवर सखोल अभ्यास करून हा निष्कर्ष काढला आहे. सोयाबीनपासून तयार केलेले पदार्थ सेवन केल्यास बाळाला स्वलीनता (ऑटिजम) सोबतच ताप येण्यास सुरुवात होते. प्राण्यांच्या दुधापेक्षा सोयाबीनचे दूध अधिक इंडोक्राईन असल्याने शरीराच्या वाढीची पद्धतच बदलत असते. सोयाबीनपासून तयार करण्यात येत असलेल्या अनेक पदार्थामध्ये ‘इंडोक्राईन’ असते. प्राण्यांचे दूध घेणार्‍या बाळांमध्ये 1.6 टक्के तापाचे प्रमाण राहात असून सोयाबीनपासून दूध घेणार्‍या बाळांमध्ये तेच प्रमाण 4.2 टक्के राहात असल्याचेही या निष्कर्षात म्हटले आहे.
 
बालरोगतज्ज्ञ बालकांना सोयाबीनयुक्त पदार्थ घेण्यास मनाई करीत असतानाही 25 टक्के सोयाबीनयुक्त पदार्थ दिले जातात.