बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. अडगुलं मडगुलं
Written By

रात्री बाळाचे रडण्याचे मुख्य कारण

मूल म्हटले, की त्याचे खेळणे, हसणे आणि रडणे आलेच. ते जन्मताच रडू लागते आणि हे रडणेही सामान्य असते. परंतु जन्मानंतरही अनेकदा लहान मुले झोपेतून अचानक जागी होऊन रडू लागता. त्यांच्या रडण्याचे कारण पालकांच्या लक्षात येत न आल्याने काय करावे ते सुचत नाही. बाळाच्या रडण्याची काही मुख्य कारणे ही असू शकतात.
 
अनेकदा मुलांच्या रडण्याचे कारण हे शारीरिक त्रास असते. एवढेच नाही तर वातावरणातील तापमान खूप गरम किंवा थंड असले तरी झोपेतून अचानक उठून मुले रडतात.
 
बाळाच्या झोपण्याची जागा व्यवस्थित नसेल तर ते आरामात झोपू शकत नाहीत. हे सांगता येत नसल्याने ते रडू लागते.
थोडी मोठी झालेली मुले दीर्घकाळ शांत झोपू शकत नाहीत. त्यांना लवकर भूकही लागते. यामुळे मध्यरात्री भुकेमुळे मुले रडू लागतात.
 
मुलांचा ओला डायपर बदलला नाही तर त्यांना त्रास होऊन ते रडतात.
 
मुलांना जवळ कोणी नसेल तर असुरक्षित वाटू लागते. अनेकदा आईला न पाहूनही मुले रडतात.
 
कधी-कधी मुले विचित्र स्वप्ने पडल्यानेही घाबरुन झोपेतून उठून रडतात.